अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बनावट दारूचा कारखाना, 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बनावट दारूचा कारखाना
राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाच्या धाडीत 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त शहरात खळबळ
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्य उत्पादन शुल्क च्या पथकाने
अंबाजोगाई ग्रामीण पोलीस स्टेशन हद्दीत बुट्टेनाथ दरी मध्ये असलेल्या बनावट दारू च्या कारखान्यावर धाड टाकून 36 लाख रुपयांचा ऐवज जप्त केल्या मुळे खळबळ उडाली आहे.
मा. अधीक्षक, राज्य उत्पादन शुल्क, बीड श्री. विश्वजीत ए. देशमुख साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आज दि. 16.12.2024 रोजी गुप्त माहितीच्या आधारे मौ. बुट्टेनाथ दरी येथे काटवन झाडीत असलेल्या गोडावून शेडमध्ये ता. अंबाजोगाई जि. बीड येथे कार्यालय निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. 02 बीड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, अंबाजोगाई, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क माजलगाव, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क बीड यांच्या पथकाने कारवाई करत छापा टाकला असता सदरील गोडावून पत्री शेडमध्ये खालील प्रमाणे मुद्येमाल जप्त करण्यात आला.
या मध्ये 1) बनावट देशी दारु रॉकेट मद्याच्या 10500 बॉटल (105 बॉक्स) त्याची अं.कि. रु. 367500/- 2) एक जेएसएल जिंदाल स्टेनलेस कंपनीचे स्वयंचलित सिलींग, फिलींग व बॉटलींग मशीन अं.किं. रु. 150000/- 3) 200 लि. मापाचे स्पीरीटने भरलेले प्लास्टीक बॅरल अं.किं. रु. 25000/- 4) 200 लि. मापाचे 12 रिकामे प्लास्टीक बॅरल अं.किं. रु. 6000/- 5) 90 मिली क्षमतेच्या 100800 प्लास्टीकच्या रिकाम्या बाटल्या अं.किं. रु. 100800/- 6) देशी दारु रॉकेटचे 30000 बुचे अं.किं. रु. 30000/- 7) देशी दारु रॉकेटचे 8000 लेबल अं.किं. रु. 16000/- 8) 2000 लि. व 500 लि. चे एकुण 3 पाण्याचे बरॅल अं.किं. रु. 9000/- 9) पाण्याची मोटार 2 नगर अं.किं. रु. 10000/- 10) प्रवरा प्रिंट चे 60 टेप रोल अं.किं. रु. 3000/- 11) देशी दारु रॉकेट बॉक्स चे पुठ्ठे 1000 नग अं.किं. रु. 2000/- 12) 5 अल्कोहोल मीटर अं.किं. रु. 2500/- 13) विविध कंपनीचे 4 भ्रमणध्वनी अं.किं. रु. 75000/- 15) एक किया कंपनीचे सेलटॉस चारचाकी कार जिचा नोंदणी क्रं. एमएच-12 आरवाय- 4406 अं.किं. रु. 1000000/- 16) एक अशोक लेलँड कंपनीचे आयशर टेम्पो ज्याचा नोंदणी क्रं. एमएच-40 सीडी 3421 अं.किं. रु. 1700000/- 17) 10 लिटर क्षमतेचे इसेंस ने भरलेले प्लास्टीक कॅन अं.किं. रु. 7500/- 18) पाण्याचे प्लास्टीकचे पाईप- 5 नग अं.किं. रु. 2500/- 19) एक आर.ओ. पाणी फिल्टर मशीन अं.किं. रु. 50000/- असा एकुण रु. 3556800/- किमतीचा मुद्देमाल जप्त केला आहे. या गुन्ह्यातील आरोपी 1) आकाश गोवर्धन नेहरकर, वय : 29 वर्षे, रा. गांधीनगर, अंबाजोगाई जि. बीड 2) दिलीप शांतीलाल पावर, वय : 17 वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे 3) विकेश रघु बा्रम्हणे, वय : 17 वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे 4) जयम लालू पावरा, वय : 17 वर्षे, रा. महादेव दोंडवाडा ता. शिरपूर जि. धुळे 5) किरण दिलीप पावरा, वय : 15 वर्षे, रा. भोईटी ता. शिरपूर जि. धुळे 6) ईश्वर भाया पावरा, वय : 17 वर्षे, रा. महादेव दोंडवाडा ता. शिरपूर जि. धुळे यांना अटक करण्यात आली असुन पप्पू कदम व दिनेश गायकवाड हे फरार झाले असुन त्याचा शोध सुरु आहे. या आरोपी विरुध्द महाराष्ट्र दारुबंदी कायदा 1949 च्या विविध कलमान्वये गुन्हा नोंद करण्यात आला आहे.
ही कारवाई ही मा. श्री. विश्वजीत ए. देशमुख, अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड यांच्या मार्गदर्शनाखाली, श्री. डी.डी. चौरे, निरीक्षक, राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. 02 बीड, श्री. आर.बी. राठोड, निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क, बीड, श्री. डी.आर. ठोकळ दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क अंबाजोगाई, श्री. ए.एल. कारभारी, दुय्यम निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भ.प. क्रं. 02 बीड, तसेच श्री. आर.बी. कदम स.दु.नि., जवान- एस.व्ही. धस, आर.ए. जारवाल, बी.के. पाटील, आर.एम. गोणारे, के.एन. डुकरे, एस.व्ही. लोमटे, डी.एस. वायबट, ए.पी. कदम, श्रीमती एस.एस. ढवळे, आर.जी. मुंडे, एस.एस. ढोले, यांनी सदरील कार्यवाही यशस्वीरित्या पार पाडली. पुढील तपास श्री. डी.डी. निरीक्षक राज्य उत्पादन शुल्क भरारी पथक क्रं. 02 बीड हे करीत आहेत.
