अंबाजोगाई

अंबाजोगाई शहरात आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद तब्बल 19 मोटार सायकली जप्त करुन 15 गुन्हे आणले उघड 9 लाख 5 रु चा मुद्देमाल केला जप्त

अंबाजोगाई शहरात आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद तब्बल 19 मोटार सायकली जप्त करुन 15 गुन्हे आणले उघड 9 लाख 5 हजार रु चा मुद्देमाल केला जप्त

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड, मा.श्री. सचिन पांडकर अपर पोलीस अधीक्षक बीड, मा.श्री. चेतना तिडके अपर पोलीस अधीक्षक यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने अंबाजोगाई शहरात आंतरजिल्हा मोटार सायकल चोरी करणारी टोळी जेरबंद तब्बल 19 मोटार सायकली जप्त करुन 15 गुन्हे आणले उघड 9,05000/- रु चा मुद्देमाल केला जप्त केला आहे.
    मा.श्री. अविनाश बारगळ, पोलीस अधीक्षक, बीड यांनी मोटार सायकल चोरीचे जास्तीत जास्त गुन्हे उघडकीस आणण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखेला आदेश दिल्या नंतर मा. पोलीस निरीक्षक, स्था.गु.शा.बीड यांनी मोटार सायकल चोरी करणारे आरोपींची माहिती काढुन गुन्हे उघडकीस आणण्यासाठी अधिपत्याखालील अधिकारी यांना योग्य मार्गदर्शन करून आदेश दिलेले आहेत. त्याअनुषंगाने दिनांक 15/12/2024 रोजी पोलीस पोउपनि श्री. सुशांत सुतळे यांना पो.स्टे. अंबाजोगाई शहर गुरनं 531/2024 कलम 303(2) भा.न्या.सं. या गुन्हयातील मोटार सायकल ही वीरसिंग शेरसिंग गोके रा. सदर बाजार रोड अंबाजोगाई याने चोरुन नेली असल्याची माहिती मिळाली तेव्हा ही माहिती पो.नि. श्री. उस्मान शेख यांना कळवुन त्यांनी आरोपीचा शोध घेवुन तपासाबाबत मार्गदर्शन केले त्यावरुन पोउपनि श्री. सुशांत सुतळे, पोलीस हवालदार मारुती कांबळे, बाळकृष्ण जायभाये, विकास राठोड, विष्णु सानप, देविदास जमदाडे, निलेश ठाकुर, मच्छिंद्र बीडकर, पोशि/सचिन आंधळे, अश्विनकुमार सुरवसे व चालक नितीन वडमारे हे पथक तात्काळ अंबाजोगाई येथे रवाना होवुन आरोपीचा शोध घेत असतांना वीरसिंग गोके हा चनई रोडवर सिताफळ संशोधन केंद्राजवळ चोरीची गाडी विक्री करण्यासाठी येणार असल्याची खात्रीलायक बातमी मिळाली वरुन सदर ठिकाणी तो पथकाला पाहुन गाडीघेवुन पळून जाण्याचे बेतात असतांना पथकाने सापळा लावुन त्यास पकडले. त्यास त्याचे नाव विचारले असता त्याने त्याचे नाव वीरसिंग शेरसिंग गोके वय 22 वर्षे रा.बी. एन्ड सि ऑफिसचे बाजुस सदर बाजार रोड अंबाजोगाई असे सांगितले व त्यास त्याचे ताब्यातील स्पेंडर प्लस मॉडेलची मो.सा. संदर्भात विचारपुस केली असता त्याने मोटार सायकल ही त्याच्या साथीदाराने चोरुन आणली आहे. अभिलेख पडताळणी केली असता वरील गुन्हयातील मोटार सायकल निष्पन्न झाली. त्यानंतर त्यास अधिक विचारपुस केली असता त्याने त्याचे घरातुन 10 मो.सा.मिळुन आल्या. त्याने इतर व्यक्तींना गाडी फायनान्सची असल्याचे कारण भासवुन कागदपत्र नंतर देतो म्हणुन 08 मोटार सायकल दिलेल्या होत्या अशा एकुण 18 मोटार सायकल जप्त करण्यात आल्या आहेत. सदर आरोपीचे ताब्यातुन बीड जिल्हयातील 13 व बाहेर जिल्हयातील 02 असे एकुण 15 गुन्हे उघडकीस आणलेले असुन उर्वरित 3 मोटार सायकले मालकाचा शोध घेणे चालु आहे.
    एकंदरीत स्था.गु.शा. बीड ने एकुण 19 मो.सा. किंमत अंदाजे 9 लाख 5 हजार रु.चा मोटरसायकलचा मुद्देमाल जप्त केलेला आहे. आरोपी नामे वीरसिंग शेरसिंग गोके वय 22 वर्षे रा.बी.एन्ड सि ऑफिसचे बाजुस सदर बाजार रोड अंबाजोगाई यास व जप्त 19 मोटार सायकल ह्या पुढील कार्यवाहीसाठी पो.स्टे. अंबाजोगाई शहर यांच्या ताब्यात देण्यात आलेल्या असुन सर्वरित फरार आरोपीचा शोध घेणे चालु आहे. सदर आरोपीकडुन इतरही मोटार सायकल चोरीचे गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!