प्रवीण मार्कंडेय यांनी वडिलांच्या स्मरणार्थ तीन शाळेना दिल्या सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन
प्रवीण मार्कंडेय यांनी वडिलांच्या स्मरणार्थ तीन शाळेना दिल्या सॅनिटरी नॅपकीन वेंडींग मशीन
अंबाजोगाई -: येथील सार्वजनिक बांधकाम विभागातील सेवानिवृत्त कार्यकारी अभियंता प्रवीण मार्कंडेय यांनी त्यांचे वडील
स्व. डॉ. मनमोहन जगन्नाथ मार्कंडेय यांच्या स्मृतिप्रत्यर्थ तीन शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन देऊन शाळेतील विद्यार्थिनीची गैरसोय दूर केली.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या माध्यमातून रोटेरियन प्रवीण मार्कंडेय यांनी त्यांचे वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ अंबाजोगाई शहरातील व्यंकटेश विद्यालय, स्वामी विवेकानंद विद्यालय व अंबाजोगाई तालुक्यातील देवळा येथील विश्वरुपी विद्यालय या तीन शाळांमध्ये सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन बसवण्यात आल्या. स्वर्गीय डॉक्टर मनमोहन जगन्नाथ मार्कंडेय हे स्वतः डॉक्टर होते. अनेक सामाजिक कार्यात नेहमी अग्रणी असायचे. सन १९७८ साली त्यांनी सॅनेटरी नॅपकिन बीड जिल्ह्यात ग्रामीण भागात सीमा सॅनेटरी नॅपकिन निर्मिती च्या उद्योगाला चालना दिली होती. त्यांचे पुत्र प्रवीण मार्कंडेय यांनी त्यांच्या वडिलांच्या स्मृती प्रित्यर्थ त्यांच्या जयंती निमित तीन शाळांना रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी च्या माध्यमातून संयुक्त विद्यमाने सॅनिटरी नॅपकिन वेंडिंग मशीन देण्याचा निर्धार करून आपले सामाजिक उत्तरदायित्व निभावले. आपल्या वडिलांची समाजसेवे ची परंपरा त्यांनी कायम ठेवली.या कार्यक्रमास रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी चे अध्यक्ष कल्याण काळे सचिव धनराज सोलंकी, प्रवीण मार्कंडेय , संतोष मोहिते डॉ. निशिकांत पाचेगावकर, स्वरूपा कुलकर्णी यांच्यासह मान्यवरांची उपस्थिती होती.
