अंबाजोगाई

लातूर रोड वरील वाघाळा पाटी नजीक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात 2 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी 

लातूर रोड वरील वाघाळा पाटी नजीक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 3 जण गंभीर जखमी 

अपघाताने चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर, ना गडकरी साहेब आपला शब्द कधी पूर्ण करणार

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
  मित्राची पोलीस भरती मध्ये निवड झाल्याचा आंनदोत्सव साजरा करून परत येत असताना
लातूर रोड वरील वाघाळा पाटी नजीक ट्रक व कारच्या झालेल्या भीषण अपघातात 3 जण ठार तर 3 जण गंभीर रित्या जखमी झाल्याची दुर्घटना आज सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास घडली असून सर्व जखमींची प्रकृती चिंताजनक आहे. दरम्यान या घटनेने लातूर रोड वरील चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
     या विषयी प्राप्त माहिती आशी की,
रेणापूर तालुक्यातील कारेगाव येथील रहिवासी अजीम पाशु भाई यांची पुणे पोलिसात भरती झाल्या मुळे सर्व मित्र मंडळी सोमवारी रात्री पार्टी करण्या साठी मांजरसुंबा येथे गेले होते, पार्टी करून परत लातूरच्या दिशेने येत असताना अंबाजोगाई लातूर रोड वरील वाघाळा पाटी नजीक आज सकाळी 7 वाजता लातूर च्या दिशेने निघालेली एम एच 14 एल एल 6749 ही स्विफ्ट डिझायर टुरिस्ट गाडी व लातूरहुन येणाऱ्या ट्रक चा भीषण अपघात होऊन कारचा चक्का चुर झाला. या अपघातात डिझायर मधून प्रवास करणारे 3 जण ठार झाले असून यात फारुख शेख,दीपक सावरे,बालाजी माने यांचा समावेश आहे. तर 3 जण गंभीर रित्या जखमी झाले  असून शेख अमीन,मुबारक शेख, ऋषिकेश गायकवाड हे सर्व जण गंभीर जखमी आहेत.
सर्व जखमीला स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. मयत व जखमी हे रेणापूर तालुक्यातील कारेपूर येथील रहिवासी आहेत.
चार पदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा ऐरणीवर
    दरम्यान या घटनेने लातूर रोड वरील चारपदरी रस्त्याचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आसून नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत आ नमिता मुंदडा यांच्या प्रचारा दरम्यान केंद्रीय रस्ते मंत्री मा ना नितीनजी गडकरी यांनी जाहीर सभेत तुम्ही आ नमिता मुंदडा यांना निवडून द्या  निवडणूक झाल्यावर 6 महिन्यात हा रस्ता चार पदरी करतो असे अभिवचन दिले असून गडकरी साहेब आपल्या शब्दाची पूर्तता लवकरात लवकर करा जेणे करून दुपदरी रस्त्याच्या अपघातात आणखी बळी जाणार नाहीत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!