प्रकाश शिंदे यांच्या थेलेसिमीयाग्रस्त बाल रुग्णांसाठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात प्रकाश बोरगावकर यांनी केले 70 व्या वेळी रक्तदान
*तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांचे 70 वे रक्तदान संपन्न*
——————————–
प्रकाश शिंदे यांच्या थेलेसिमीयाग्रस्त बाल रुग्णांसाठी आयोजित केलेल्या रक्तदान शिबिरात रक्तदान
(अंबाजोगाई) येथील बनारस घराण्याचे सुप्रसिद्ध तबलावादक व सामाजिक कार्यकर्ते तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी सतरावे रक्तदान करून अनोखा उपक्रम केला आहे. शासकीय रक्तपेढी स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय अंबाजोगाई येथे थैलीसेमियाग्रस्त रुग्णांच्या मदतीसाठी गटशिक्षणाधिकारी कार्यालय अंबाजोगाई येथील श्री प्रकाश शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरामध्ये तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी आपले सतरावे रक्तदान करून आपली या रुग्णांप्रती सामाजिक बांधिलकी जोपासण्याचे काम केले आहे. याप्रसंगी मेडिसिन विभाग प्रमुख डॉ.सिद्धेश्वर बिराजदार, माजी नगराध्यक्ष महादू मस्के, डॉ.नितीन चाटे, शिवकुमार मोहेकर, श्री प्रकाश शिंदे यांच्यासह अनेकांची उपस्थिती होती. तालमार्तंड प्रकाश बोरगावकर यांनी संगीत क्षेत्रामध्ये अनेक शिष्यांना घडवून अंबाजोगाईची ख्याती सर्व दूर पसरवली आहे. संगीत क्षेत्राबरोबरच विविध सामाजिक उपक्रमात प्रकाश बोरगावकर यांचा सतत सहभाग असतो. कोविड सारख्या महाभयंकर कठीण काळातही प्रकाश बोरगावकर यांनी covid वार्डामध्ये प्रत्यक्ष रुग्णांना आधार देण्याचे काम केले होते. तसेच covid रुग्णांना मानसिक आधार देऊन लवकरात लवकर बरे होण्यासाठी ऑक्सिजन या सांकेतिक कार्यक्रमाचेही कोविड सेंटर मध्ये आयोजन केले होते. एक घास तुमचा या उपक्रमाद्वारे सलग सहा महिने अंबाजोगाईतील मोकाट जनावरांना चारा उपलब्ध करून देण्याचा त्यांचा उपक्रमही संपूर्ण महाराष्ट्रभर गाजला होता. विशेष म्हणजे अंबाजोगाई त्यांनी सुरू केलेला एक घास तुमचा हा उपक्रम महाराष्ट्रातील अनेक नगरपालिका व महानगरपालिका हद्दीमध्ये राबवण्यात आला. विविध सामाजिक उपक्रमासोबतच रक्तदान हे सर्वश्रेष्ठ दान आहे आणि प्रत्येकाने रक्तदान करून निसर्गाने आपल्याला दिलेल्या दातृत्वाचा सुखद अनुभव घ्यावा यासाठी त्यांनी 70 वे रक्तदान करून सर्वांना संदेश दिला आहे.
