महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
महापरिनिर्वाण दिनानिमित्त आयोजित रक्तदान शिबिरात ५५ जणांचे रक्तदान
राष्ट्रसंवर्धन मंडळाच्या वतीने महामानवास अनोखे अभिवादन
अंबाजोगाई :- येथील राष्ट्रसंवर्धन मंडळाच्या वतीने बोधीसत्व, महामानव भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या महापरिनिर्वाण दिनानिमित्त रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या रक्तदान शिबिरात ५५ रक्तदात्यानी रक्तदान केले.
. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्थापनेला १०० वर्ष पूर्ण होत असताना व बाबासाहेबांनी दिलेला सामाजिक समरसतेच्या संदेशाची जागृती करण्यासाठी पांचजन्य या कार्यालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.
यावेळी समाजातील विविध स्तरातील ५५
लोकांनी भाग घेऊन रक्तदान केले.यात युवक,युवती,पुरूष व महिलांनी उत्स्फूर्त सहभाग घेतला. सामाजिक एकता व समरतेसाठी रक्तदान हे बीद्र वाक्य घेऊन शासकीय रक्तपेढी अंबाजोगाई यांच्या मार्गदर्शनाखाली हे रक्तदान शिबिर पार पडले. रक्तदान सुरू होण्यापुर्वी डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांना आंबेडकर चौक येथे अभिवादन करण्यात आले.
या रक्तदान शिबिराचे उदघाटन राष्ट्रसंवर्धन मंडळाचे सचिव विजय वालवडकर,प्रांत बौध्दिक प्रमुख आनंद गुजर,जिल्हा कार्यवाह बिपीन क्षीरसागर,प्रांत महाविद्यालय प्रमुख राकेश मोरे,दिनदयाळ बॅकेंचे अध्यक्ष मकरंद पत्की,खोलेश्वर शैक्षणिक संकुलाचे कार्यवाह किरण कोदरकर,जिल्हा संपर्क प्रमुख ॲड.जयदिप विर्धे,तालुका कार्यवाह योगेश कुलकर्णी,महेंद्र निकाळजे, कृष्णा लोमटे,उन्मेष मातेकर यांची उपस्थिती होती.
या रक्तदान शिबिराच्या यशस्वीतेसाठी शैलेश कंगळे, योगेश कुलकर्णी यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व स्वयंसेवकांनी प्रयत्न केले.
