अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणी तपास सीबीआय मार्फत व्हावा :- डॉ राजेश इंगोले*
*अंबाजोगाईच्या स्वामी रामानंद तीर्थ रुग्णालयातील बनावट औषध प्रकरणी तपास सीबीआय मार्फत व्हावा :- डॉ राजेश इंगोले*
—————————————
प्रतिनिधी, अंबेजोगाई
स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयातील रुग्णांना देण्यात आलेली औषधी बनावट असल्याचे तपासणी अहवालात सिद्ध झाले आहे. याप्रकरणी अन्न औषध निरीक्षक यांच्या फिर्यादीवरून चार औषध कंपन्यांवर गुन्हेही दाखल झाले आहेत. याप्रकरणी सीबीआय चौकशीची मागणी अंबेजोगाईचे माजी शिक्षण सभापती डॉ. राजेश इंगोले यांनी एका निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना उपविभागीय आधिकारी कार्यालयामार्फत केली आहे.
या घटने बाबत बोलताना डॉ इंगोले यांनी हे प्रकरण वरकरणी वाटते तेवढे सोपे नाही. या कंपन्यांनी महाराष्ट्रातील इतर वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय या ठिकाणीही याच प्रकारची बनावट औषधी वितरित केली असल्याची शक्यता आहे. याप्रकरणी वैद्यकीय संचालक कार्यालयातील वरिष्ठ अधिकारी व कर्मचारी यांचाही सहभाग असल्याची शक्यता नाकारता येत नाही कारण ही औषधी वितरित करण्याची शासकीय मान्यता ही याच संचालक कार्यालयाकडूनच दिली जाते.
या लोकांची बनावट औषधी देण्याची हिम्मत होतेच कशी हा सवाल करत सदरील गंभीर प्रकार हा महाराष्ट्रातील सर्व शासकीय रुग्णालयात घडल्या असण्याची शक्यता आहे. हा प्रकार म्हणजे सर्वसामान्य रुग्णांच्या जीविताशी खेळ करण्याचा गंभीर प्रकार आहे.
तरी या प्रकरणाची पाळेमुळे उकरून याचा निष्पक्षपाती तपास होणे गरजेचे आहे. तसेच या आरोपींविरुद्ध या कंपन्यांविरुद्ध कायदेशीर कार्यवाही होणे गरजेचे आहे. जेणेकरून भविष्यामध्ये इतर कंपन्या असा प्रकार करण्याचे धाडस करणार नाही यासाठी हे प्रकरण सीबीआय कडे देऊन सर्वसामान्य जनतेला न्याय मिळावा ही अपेक्षा सर्वसामान्य जनतेची आहे. या प्रकरणात कुणालाही पाठीशी घालण्यात येवु नये त्यासाठी या घटनेचा पाठपुरावा आपण शेवटपर्यंत करणार असल्याची माहितीही डॉ राजेश इंगोले यांनी दिली आहे.
