राज्याच्या मंत्री मंडळ विस्तारात बीड जिल्ह्यातून आ धनंजय मुंडे व आ पंकजाताई मुंडे या दोन्ही बहीन भावाची वर्णी लागणार का?
राज्याच्या मंत्री मंडळ विस्तारात बीड जिल्ह्यातून आ धनंजय मुंडे व आ पंकजाताई मुंडे या दोन्ही बहीन भावाची वर्णी लागणार का?
मंत्रीपदा साठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले आ सुरेश अण्णा धस व आ प्रकाश दादा सोळंके या दोघांचे समाधान महायुतीचे नेते कसे करणार ?
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
11 डिसेंम्बर रोजी होणाऱ्या महाराष्ट्र राज्याच्या मंत्री मंडळात बीड जिल्ह्यातून आ धनंजय मुंडे व आ पंकजाताई मुंडे या दोन्ही बहीन भावाची वर्णी लागणार की दोघा पैकी एकाचा पत्ता कट होणार या सह मंत्रीपदा साठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले आ सुरेश अण्णा धस व आ प्रकाश दादा सोळंके या दोघांचे समाधान महायुतीचे नेते कसे करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
राज्यात महायुतीला अभूतपूर्व यश मिळाल्या नंतर मुख्यमंत्री पदावरून तब्बल 12 दिवस चाललेल्या राजकीय नाटया नंतर मुख्यमंत्री म्हणून मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या नावावर भाजपच्या बैठकीत शिक्का मोर्तब झालं आणि काल मुख्यमंत्री पदाचा पद्ग्रहन सोहळा मान्यवराच्या उपस्थिती मध्ये संपन्न झाला यावेळी उपमुख्यमंत्री म्हणून मा ना एकनाथ शिंदे व अजित दादा पवार यांनीही शपथ घेतली
या निवडणुकीत महायुतीचा प्रमुख घटक पक्ष असलेल्या भाजपला 132 जागेवर, शिवसेना एकनाथ शिंदे गटाला 57 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाला 41 जागेवर विजय मिळाला असून आता 11 डिसेंम्बर रोजी महाराष्ट्र राज्याचा मंत्री मंडळ विस्तार होणार असल्याचे व या मध्ये महायुती मधील भाजपच्या 21 शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या 12 तर राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाच्या 10 मंत्र्यांना शपथ दिली जाणार असल्याचे वृत्त आहे.

या मध्ये बीड जिल्ह्यातून आ धनंजय मुंडे व आ पंकजाताई मुंडे या दोन्ही बहीन भावाची वर्णी लागणार की दोघा पैकी एकाचा पत्ता कट होणार या सह दोघांना मंत्री पद दिल्यावर पालकमंत्री पदाची जबाबदारी कोणाकडे येणार या चर्चेला उधाण आले आहे. शिवाय मंत्रीपदा साठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेले अष्टीचे आमदार सुरेश अण्णा धस हे ही मुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस यांच्या जवळचे आहेत मग धस आणि माजलगावचे आमदार प्रकाश दादा सोळंके या दोघांचे समाधान महायुतीचे नेते कसे करणार या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
Post Views: 309