सरसेनापती संताजी घोरपडे शुगरचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट*
सरसेनापती संताजी घोरपडे शुगरचे अध्यक्ष नविद मुश्रीफ यांची राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- सरसेनापती संताजी घोरपडे शुगरचे अध्यक्ष तथा राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री ना हसन मुश्रीफ यांचे सुपुत्र नविद मुश्रीफ हे अंबाजोगाई शहरात आले असतांना त्यांनी राजकिशोर मोदी यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी त्यांचे स्वागत श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत राजकिशोर मोदी यांनी शाल फेटा व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. याप्रसंगी नविद मुश्रीफ व संकेत मोदी यांच्यात नुकत्याच संपन्न झालेल्या विधानसभा निवडणुकीच्या संदर्भात तसेच राजकीय ,सामाजिक त्याचबरोबर शैक्षणिक विषयावर सांगोपांग चर्चा झाली. उभयतांनी आपापल्या क्षेत्रातील विविध प्रकारचे अनुभव व किस्से सांगितले.
संकेत मोदी यांनी अंबाजोगाई शहरासाठी राजकिशोर मोदी यांनी मागील चाळीस वर्षात राबविलेल्या विविध विधायक उपक्रमाविषयी माहिती नविद मुश्रीफ यांना दिली. त्याचबरोबर अंबाजोगाई शहरात सुरू केलेल्या आर्थिक संस्थेची देखील सविस्तरपणे चर्चा केली. नविद मुश्रीफ यांनी देखील अंबाजोगाई पिपल्स को ऑप बँक व त्यांचा विस्तारीत शाखांविषयी जाणून घेतल्यावर आनंद व्यक्त करत राजकिशोर मोदी व संकेत मोदी यांचे अभिनंदन केले. मोदी लर्निंग सेंटरच्या माध्यमातून आजपर्यंत अनेक मोठमोठे अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर , वैज्ञानिक तसेच खेळाडू तयार झाल्याचे समजल्यावर अंबाजोगाई शहरातील शैक्षणिक वातावरण व येथील यशस्वी विद्यार्थ्यांचे देखील कौतुक व अभिनंदन करत आपल्या वतीने देखील कार्यक्षेत्रात असेच विधायक उपक्रम राबविण्याची इच्छा व्यक्त केली.
