पोखरी येथे दलित समाजाच्या दोन गटात तर अंबाजोगाईत मुस्लिम समाजाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी 2 जण जखमी
पोखरी येथे दलित समाजाच्या दोन गटात तर अंबाजोगाईत मुस्लिम समाजाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी 2 जण जखमी
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
पोखरी येथे दलित समाजाच्या दोन गटात तर अंबाजोगाई शहरातील क्रांती नगर येथे मुस्लिम समाजाच्या दोन गटात तुंबळ हाणामारी होऊन 2 जण जखमी झाल्याचे वृत्त आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, अंबाजोगाई शहरा पासून 6 किलोमीटर अंतरावर असलेल्या पोखरी येथे आज दुपारी मोबाईलच्या कारणा हुन दलित समाजाच्या दोन गटात शाब्दिक चकमक झाली होती, याचे रूपांतर संध्याकाळी 8 वाजण्याच्या सुमारास हाणामारीत झाले. यातील एका गटाने
दुसऱ्या गटावर सिनेस्टाईल तलवारीचा वापर करून ढवारे नामक व्यक्तीला जखमी केले असून या जखमीस स्वाराती रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. दरम्यान जखमीचे नातेवाईक हल्लेखोराचा शोध घेत आसल्याची माहिती मिळताच ग्रामीण ठाण्याचे पोलीस कर्मचारी पोखरीत घटणास्थळी दाखल झाले आहेत.
तर अंबाजोगाई शहरातील क्रांती नगर भागात आज रात्री 7 वाजण्याच्या सुमारास मुस्लिम समाजाच्या 2 गटात तुंबळ हाणामारी झाल्या नंतर हा जमाव अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशनमध्ये आला व त्या ठिकाणीही गोंधळ घालू लागल्याने पोलीस स्टेशन बाहेरील रस्त्यावर वाहतूक ठप्प झाली होती. पोलिसांनी या दोन्ही गटास हुसकावून लावत यातील जखमीस स्वा रा ती रुग्णालयात पाठवले.
Post Views: 556