अंबाजोगाई

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अंबाजोगाईत गुटख्याच्या गोदामवर धाड 10 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त

बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाची अंबाजोगाईत गुटख्याच्या गोदामवर धाड 10 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त

10 ते 12 गुटख्याचे व्यापारी बिनधास्त पणे गुटखा पानपट्टी धारका पर्यंत पोचवण्याचे करतायत काम

अंबाजोगाई :- (प्रतिनिधी):

    राज्य भरात गुटखा विक्रीस बंदी असतानाही अंबाजोगाई व परिसरात 10 ते 12 गुटख्याचे व्यापारी बिनधास्त पणे गुटखा पानपट्टी धारका पर्यंत पोचवण्याचे काम करत असून आज बीड येथील स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने गुटख्याच्या गोदामवर धाड टाकून 10 लाख 67 हजार रुपयांचा माल जप्त केल्याने गुटखा विक्रेत्यांचे धाबे दणाणले आहेत.
     महाराष्ट्रामध्ये तंबाखूजन्य पदार्थावर बंदी असताना देखील बीड जिल्ह्यात सर्रासपणे खुलेआम गुटखा विक्री होत असून याकडे अन्न व औषध प्रशासनाने अर्थपूर्ण दुर्लक्ष केल्यानेच खुलेआम गुटखा विक्री होत असल्याचे समोर आले आहे. त्यामुळे बीड जिल्ह्यात किराणा दुकान, पान टपरी, हॉटेल मध्ये सहज गुटखा उपलब्ध होतो. स्थानिक गुन्हे शाखा बीडचे सहाय्यक पोलीस निरीक्षक दराडे यांना आंबेजोगाई शहरात एक गुटक्याचे गोडाऊन असल्याची गुप्त माहिती मिळाल्याने मंगळवारी दराडे यांनी एका गुटख्याच्या गोडावूनवर छापा मारून लाखोंचा माल ताब्यात घेतला. बाळराजे दराडे यांनी जिल्ह्यात अवैध धंद्यांवर वाळू, मुरूम, बनावट ग्रीस, गुटखा यावर मोठ्या कारवाया केल्या होत्या. बाळराजे दराडे यांनी पुन्हा एकदा अवैध धंद्यांवाल्यांकडे आपला मोर्चा वळविला असून
     अंबाजोगाई शहरातील गणेश प्रोव्हिजन या गोडावूनवर छापा मारून रजनीगंधा, आर.एम.डी, विमल, गोवा, बाबा या नावाचा गुटखा ताब्यात घेतला आहे. या कारवाईत 10 लाख 67 हजारांचा माल पोलिसांनी ताब्यात घेतल्याचे कळत असून या कारवाईत सहाय्यक पोलीस निरीक्षक बाळराजे दराडे, पोलीस उपनिरीक्षक घाडगे, पो.ह.मोराळे,. मुंडे, पो. मोराळे पो. मस्के, पो.ना. नामदेव सानप यांचा सहभाग होता. या कारवाईने अवैधधंदे करणाराचे व गुटखा माफीयांचे धाबे दणाणले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!