अंबाजोगाई

दिव्यांग हे देखील समाजाचे मूलभूत घटक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू–संकेत मोदी*

दिव्यांग हे देखील समाजाचे मूलभूत घटक असून त्यांचे प्रश्न सोडवण्यासाठी सदैव कटिबद्ध राहू–संकेत मोदी

अंबाजोगाई शहरात जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांग रॅलीचे यशस्वी आयोजन

अंबाजोगाई (प्रतिनिधी):- आपल्या समाजातील दिव्यांग बांधव हे देखील सामाजाचे एक महत्वाचे घटक असून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध राहणार असल्याचे श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी स्पष्ट केले. आज जागतिक दिव्यांग दिनानिमित्त अंबाजोगाई शहरातील सर्व मूकबधिर, दिव्यांग शाळेतील विद्यार्थ्यांची एकत्रित रॅली काढण्यात आली होती. याप्रसंगी श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी, बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठान चे सचिव संभाजी लांडे हे उपस्थित होते.
दिव्यांग दिनानिमित्त सर्वप्रथम दिव्यांगांचे आराध्य डॉ हेलन केलर यांच्या प्रतिमेचे पूजन करण्यात आले. त्यानंतर संकेत मोदी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून राष्ट्रगीत घेण्यात आले. राष्ट्रगीतानंतर उपस्थित सर्व विद्यार्थ्यांना फळांचे वाटप करण्यात आले. जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आपले मनोगत व्यक्त करतांना श्री बालाजी शिक्षण प्रसारक मंडळाचे कार्यकारी संचालक संकेत मोदी यांनी समाजातील सर्वच दिव्यांग बांधव हे आपल्या समाजाचेच एक महत्वाचे घटक असून त्यांचे मूलभूत प्रश्न सोडवण्यासाठी आपण सदैव कटिबद्ध असल्याचे सांगितले. दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर नेहमी हसू फुलवण्यासाठी त्यांना आनंदी व समाधानी ठेवणे हे महत्वाचे असल्याचे संकेत मोदी यांनी याप्रसंगी नमूद केले.
बाबासाहेब परांजपे प्रतिष्ठानचे सचिव संभाजी लांडे यांनी आपल्या मनोगतात म्हणाले की, दिव्यांग देखील ईश्वराचाच अंश असून त्यांच्याकडे दुर्लक्ष न करता त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी आपण त्यांना साथ दिली पाहिजे जेणेकरून त्यांना आपणात काहीतरी कमी असल्याची भावना निर्माण होणार नसल्याचे सांगितले.

जागतिक दिव्यांग दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या दिव्यांग रॅलीस संकेत मोदी व संभाजी लांडे यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखवण्यात आला. या रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहताना दिसून येत होता. या रॅलीमध्ये दिव्यांग विद्यार्थ्यांना प्रोत्साहन देण्यासाठी काही सामान्य विद्यार्थी देखील सहभागी झाले होते. या रॅलीमध्ये दिव्यांग शाळेतील मुख्याध्यापक, शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी देखील मोठया संख्येने सहभागी झाल्याचे दिसून आले. या दिव्यांग रॅलीत जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य विनायक मुंजे, बोधवर्धिनी मतिमंद विद्यालयाचे (मुलींचे) मुख्याध्यापक तात्यासाहेब चव्हाण, ज्ञानवर्धिनी मूकबधिर मुलांचे विद्यालय रामराव घुगे, अहिल्यादेवी मूकबधिर मुलींचे विद्यालयाचे मुख्याध्यापक राजाभाऊ मस्के, बाबासाहेब परांजपे अपंग विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती ललिता चव्हाण, कर्तव्य मतिमंद मुलींचे विद्यालयाचे मुख्याध्यापिका श्रीमती अनिता चौधरी, मानव विकास मूकबधिर विद्यालयाचे मुख्याध्यापक आनंद टाकळकर, मानव विकास मतिमंद विद्यालय आप्पासाहेब चव्हाण, मानव विकास अस्थिव्यंग विद्यालयाचे मुख्याध्यापक इंद्रकुमार लोढा यांच्यासह विशेष शाळेतील शिक्षक तथा शिक्षकेतर कर्मचारी यांच्यासह जोधाप्रसादजी मोदी माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थी बँड पथकासह उत्स्फूर्तपणे सहभागी झाले होते. सर्व कार्यक्रमाचे प्रास्ताविक आनंद टाकळकर,
सूत्रसंचलन गोविंद जगधने तर आभार रामराव घुगे यांनी व्यक्त केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!