*_ईव्हीएमला जबाबदार धरत महाराष्ट्रात विरोधकांचा बिनपैशाचा तमाशा सुरू_* *तर मग खा.प्रियांका गांधी राजीनामा देणार का ? -भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी*
ईव्हीएमला जबाबदार धरत महाराष्ट्रात विरोधकांचा बिनपैशाचा तमाशा सुरू
तर मग खा.प्रियांका गांधी राजीनामा देणार का ? -भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यात विधानसभा निवडणुकीत महायुतीला बहुमताने जनादेश मिळाल्यानंतर यशाचे खापर विरोधकांनी ईव्हीएम मशिनवर नेहमीप्रमाणे फोडले असुन सद्यस्थितीत मविआ नेत्यांची सुरू असलेली आरडाओरड म्हणजे बिनपैशाचा तमाशा होय. आपला तो बबल्या, दुसर्याचं कार्ट ही निती विरोधकांची असुन विजयाला ईव्हीएम मशिनच जबाबदार असेल तर मग वायनाड लोकसभेत विजयी झालेल्या काँग्रेस नेत्या खा.प्रियंका गांधी यांचा विजय बोगस समाजावा का ? असं म्हणत भाजपाचे प्रदेश प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी फारच ईव्हीएम मशिनवर राग असेल तर खासदार प्रियांका गांधींचा राजीनामा मल्लिकार्जुन खरगे का घेत नाहीत ? तर जितेंद्र आव्हाडांनी ही स्वाभिमानाने त्यांचा राजीनामा द्यावा असं त्यांनी म्हटलं.
प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात कुलकर्णी यांनी म्हटले आहे की, नुकत्याच झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज्यातील जनतेने पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या नेतृत्वावर विश्वास टाकताना राज्यात मागच्या अडीच वर्षांत महायुतीच्या सरकारने केलेली अभुतपुर्व कामगिरी जनसामान्य जनतेच्या हिताचं काम आणि लाडक्या बहिणीसाठी सुरू केलेली योजना हेच खर्या अर्थाने यशामागचं कवित्व आहे. मविआच्या नेत्यांना आपण सत्तेत येवु याची खात्री का पटली होती ? कारण मागच्या दोन अडीच वर्षात राज्यात सत्ताधार्यांची केवळ बदनामी केल्याशिवाय त्यांनी सकारात्मक राजकारण केलं नाही. वास्तविक पहाता विरोधकांच्या अपयशाचे धनी खा.संजय राऊत, आ.नानाभाऊ पटोले, आ.जितेंद्र आव्हाड यांच्यासारखे वाचाळवीर असुन खरं आत्मपरीक्षण मविआच्या नेत्यांनी करायला हवं. राज्यातील सर्वसामान्य जनता मात्र महायुतीच्या अर्थात सत्ताधार्यांवर प्रचंड विश्वास टाकत खंबीरपणे पाठीमागे उभी राहिली आणि जनादेश अभुतपुर्व यशाने मिळवुन दिला. राजकारण सकारात्मक करायला हवं पण आम्हाला मिळालेला विजय विरोधकांना सहन होईना. वास्तविक पहाता राज्यातील जनतेने राहुल गांधी, शरदचंद्र पवार आणि उद्धवजी ठाकरे यांना त्यांची जागाच दाखवुन दिली असा जनादेश महायुतीला दिला. निकाल आल्यानंतर अपयशाचं आत्मपरीक्षण न करता ही मंडळी आता ईव्हीएमच्या नावाने नेहमीप्रमाणे बिनपैशाचा तमाशा करू लागली. त्यात खा.मल्लिकार्जुन खरगे यांच्यासह राज्यातील सर्व मविआच्या नेत्यांनी तमाशात घेतलेला सहभाग आश्चर्यकारक म्हणावा लागेल. आपला तो बबल्या, दुसर्याचं ते कारटं ही निती विरोधकांची नेहमीच राहिली. कर्नाटकासह अनेक राज्यात काँग्रेसला विजय मिळाला. तिथं ईव्हिएम मशिन चांगली वाटते. एवढंच नव्हे तर याच निवडणुकी दरम्यान वायनाड लोकसभा मतदारसंघात खा.प्रियंका गांधी प्रचंड मतांनी निवडुन आल्या. नांदेड लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली. एवढेच काय तर मविआला देखील बोटावर मोजता येतील एवढ्या विधानसभेच्या जागा मिळाल्या. त्यांचा विजय त्यांना ईव्हीएमवर मान्यच कसा होतो ? राष्ट्रीय काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे मोठ्याने ओरडून ईव्हीएमच्या नांवाने गळा काढु लागले. देशभरात आंदोलन उभा करण्याची घोषणा केली. प्रश्न हा पडतो. मग वायनाडमधुन विजयी झालेल्या खासदार प्रियांका गांधी यांचा काँग्रेसनं अगोदर राजीनामा घ्यायला हवा. ज्यामुळे ईव्हीएम मशिन तुम्हाला मान्य नाही याची सिद्धता होईल. आ.जितेंद्र आव्हाडांसारखे पोपटपंची आता करू लागले. खरं तर त्यांनीही अगोदर राजीनामा द्यायला हवा. ईव्हीएमच्या नांवाने विरोधकांची ओरड म्हणजे कुस्तीच्या मैदानात नुरा कुस्ती निकाली निघुन देखील पाट लागलीच नाही. असं पराभुत होणार्या पहिलवानाकडून म्हणावी तशी ओरड विरोधक करताना दिसतात.
======================
=======================
