Skip to content
अंबाजोगाईत मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी _नागरिकांनी लाभ घेण्याचे डॉ.अतुल शिंदे यांचे आवाहन

——
अंबाजोगाई -: अंबाजोगाईत मधुमेहावरील महाशिबीर व मोफत रक्त तपासणी शिबिराचे आयोजन २९ नोव्हेंबर शुक्रवार रोजी सकाळी ९.३० वाजता
योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई येथे आयोजित करण्यात आले आहे. अशी माहिती प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी दिली.
येथील रोटरी क्लब ऑफ अंबाजोगाई सिटी,आयएमए , ॲम्मपा व योगेश्वरी डायबेटीस केअर सेंटर, प्रशांत नगर, अंबाजोगाई यांच्या वतीने दर वर्षी जागतिक मधुमेह दिनाचे औचित्य साधून
अंबानगरीतील नागरिकांसाठी जागतिक मधुमेह दिनानिमित्त
मधुमेहावरील महाशिबीर व
मोफत तपासण्या व मोफत औषध उपचार केले जातात. याही वर्षी ही सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे.या शिबिराचा लाभ सर्व मधुमेही, रक्तदाब, थायरॉईड, हृदयविकार व ४० वर्षापासून पुढील व्यक्तींनी घ्यावा.असे आवाहन प्रसिद्ध मधुमेह तज्ज्ञ डॉ अतुल शिंदे यांनी केले आहे.
———–
शिबीरातील मोफत तपासण्या-:
वजन व उंची, रक्तदाब, रक्तशर्करा, तीन महिन्यांची साखरेची सरासरी, किडनीची तपासणी, रक्तातील चरबी,शरीरातील चरबी,पायांच्या नसांची तपासणी,ई.सी.जी., थायरॉइड तपासणी व युरीन तपासणी अश्या विविध प्रकारच्या तपासण्या केल्या जाणार आहेत.
—
Post Views: 219
error: Content is protected !!