*दिड हजार रुपये यायले म्हणून लाडक्या बहिणींनी महायुतीला मतदान केलं की मालकाचा खिसा तीन हजाराने कापल्या चाललाय म्हणून महाविकास आघाडीला मतदान केलं ? याचं उत्तर 23 नोव्हेंबर रोजी मिळणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दरमहा दिड हजार रुपये यायला लागले म्हणून महाराष्ट्रा मधील मुख्यमंत्री महोदयांच्या लाडक्या बहिणींनी महायुतीच्या उमदवारांना मतदान केलं की दरमहा आपल्या मालकाचा खिसा तीन हजाराने कापल्या चाललाय म्हणून महाविकास आघाडीच्या उमदवारांना मतदान केलं याचं उत्तर आता 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
मागील अडीच वर्षात शिवसेना व राष्ट्रवादी काँग्रेसची तोडफोड करून महाराष्ट्र राज्याच्या सत्तास्थानी भाजप, शिवसेना एकनाथ शिंदे गट व राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गट असं महायुती च्या नावाखाली सत्तारूढ झालेलं महायुतीच सरकार याची ओळख गद्दार सरकार म्हणून देशभरात झाली., जनमानसात या सरकारची प्रतिमा ही मलिन झाल्याचे व काही करता ती सुधारत नसल्याने मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा देवेंद्र फडणवीस व दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांनी शक्कल लढवली आणि राज्यभरातील जनतेला वेगवेगळ्या प्रकारचे गाजर दाखवायला सुरू केले.
महिलांना खुश करण्यासाठी शासनाने मुख्यमंत्री लाडकी बहीण, भावाना खुश करण्यासाठी लाडका भाऊ योजना कार्यान्वित केली. या योजने अंतर्गत 21 वयाच्या पुढील 65 वयाच्या आतील मुली व महिलांच्या खात्यावर दरमहा शासनाच्या वतीने दीड हजार रुपये टाकन्याचा निर्णय घेतला व निवडणूका डोळ्यासमोर ठेऊन या योजनेची अमलबजावणीही सुरू केली. दिवाळी पर्यंत प्रत्येक लाडक्या बहिणीच्या खात्यावर पाच महिन्याचे साडेसात हजार पाठवण्यात ही आले. त्यामुळे राज्यातील सर्व लाडक्या बहिणी जाम खुश झाल्या. मात्र या लाडक्या बहिणीला द्यावयाच्या दीड हजार साठी मुख्यमंत्री महोदयांनी दाजीचा खिसा कापायला सुरू केला. सर्व जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवले, स्टॅम्प ड्युटी वाढवली. दाजी पिकवत असलेल्या शेती मालाचे भाव काही वाढवले नाहीत मात्र त्यांनी घेत असलेल्या मालाचे (मद्याचे) भाव वाढवले आणि मुख्यमंत्री महोदय दाजीचा खिसा दरमहा तीन हजाराला कापू लागले.
ही बाब राज्यातील बहुसंख्य लाडक्या बहिणीच्या लक्षातही आली आणि तेवढ्यात राज्याची विधानसभा लागली व मा ना एकनाथ शिंदे, मा ना देवेंद्र फडणवीस, मा ना अजित पवार यांच्या सह काही घटकपक्ष यांची महायुती आणि मा शरद चन्द्र पवार यांची राष्ट्रवादी, उद्धव ठाकरे यांची शिवसेना आणि काही घटक पक्ष यांची महाविकास आघाडी पुन्हा सत्तेत येण्यासाठी मतदारा पर्यंत पोचली. आज राज्यातील 288 मतदार संघातील लोकप्रतिनिधी निवडण्या साठी मतदान प्रक्रिया पार पडली. 23 नोव्हेंबर रोजी निवडणुकीचा निकाल लागणार आहे. त्यामुळे प्रश्न पडला आहे तो म्हणजे साडेसात हजार घेऊन खुश झालेल्या लाडक्या बहिणींनी अखेर मतदान कोणाला केलं ? कारण या लाडक्या बहिणीच्या जिवावर महायुतीच्या नेत्याच्या सरकार पुन्हा येण्याच्या आशा पल्लवित झाल्या होत्या.
त्यामुळे दरमहा दिड हजार रुपये यायला लागले म्हणून या लाडक्या बहिणींनी आज महायुतीच्या उमदवारांना मतदान केलं की दरमहा आपल्या मालकाचा खिसा तीन हजाराने कापल्या चाललाय म्हणून महाविकास आघाडीच्या उमदवारांना मतदान केलं याचं उत्तर आता 23 नोव्हेंबर रोजी मिळणार आहे.
