*एक सर्वसामान्य उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीमागे खंबीर ताकत उभारून त्यांची विजयश्री खेचून आणणार – राजकिशोर मोदी
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- केज विधान सभेच्या विद्यमान आमदार या मतदार संघातील युवा बेरोजगारांसाठी कसल्याही रोजगाराच्या संधी उपलब्ध करू शकल्या नसल्याची खंत राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केली. त्यांनी मतदारसंघात केवळ गुत्तेदार पोसण्यापलीकडे काहीच केले नसल्याचे मत देखील राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी व्यक्त केले. ते महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरात शहराच्या विविध भागात आयोजित बैठकीत बोलत होते. साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरातिल रविवार पेठ, फालोअर्स क्वार्टर स्नेह नगर, झारे गल्ली परिसरात आयोजित बैठकीत बोलत होते.
याप्रसंगी राजकिशोर मोदी यांच्या सोबत मनोज लखेरा, राजेंद्र मोरे, खालेद चाऊस, रमीज सर, समियोद्दिन खतीब, अमोल लोमटे, गणेश मसने, सुनील वाघाळकर , हाजी खालेक,ऍड इस्माईल गवळी ,अमजद शेख यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
अंबाजोगाई शहरातील महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना संपूर्ण केज मतदार संघातून दिवसेंदिवस वाढता पाठिंबा मिळत आहे. त्यामुळे पृथ्वीराज साठे यांचा विजयी रथ कोणीच रोखू शकत नसल्याचे चित्र निर्माण झाले आहे. त्यामुळे समोरील भाजपाचे उमेदवार यांच्या पायाखालची वाळू सरकू लागल्याने ते हवालदिल झाल्याचे दिसत आहे.अंबाजोगाई शहरात देखील राजकिशोर मोदी यांच्या माध्यमातून पृथ्वीराज साठे यांना वाढता पाठिंबा मिळत आहे. शहरातील विविध प्रभागात पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ सर्वधर्मीय बैठकांचा धडाका सुरू आहे. या बैठकीतून अनेकजण आपापला पाठिंबा जाहीर करत आहेत. या बैठकीत ऍड इस्माईल गवळी यानी पंतप्रधान देशाचे संविधान बदलू पहात आहेत . मात्र भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या संविधानात अशा काही तरतुदी करून ठेवल्या आहेत की त्यानुसार देशाचे संविधान कुणीच बदलू शकत नसल्याचे रमीज सर यांनी ठासून सांगितले
समाजसेवक राजेन्द्र मोरे यांनी देखील केज विधानसभा मतदार संघातील नागरिमांच्या व्यथा मांडल्या. यावेळी सत्तेचा माज असलेल्या उमेदवाराविरुद्ध एक सर्वसामान्य उमेदवार अशी परिस्थिती निर्माण झाली असल्याचे मोरे यांनी नमूद केले. याप्रसंगी महादेव आदमाणे यांनी राजकिशोर मोदी यांच्या भमिकेकडे संपूर्ण बीड जिल्ह्याचे लक्ष लागले होते अशी भूमिका व्यक्त केली. युवा कार्यकर्ता संजय टिपरे यांनी प्रभागातील समस्या मांडल्या.रमीज सर यानी पृथ्वीराज साठे हे फिक्स आमदार असल्याचे बोलून दाखवले. राज्यातील साधुसंतांनी राज्य एकसंघ बांधून ठेवले आहे. मात्र भाजपने ते मोडीत काढण्याचे पाप केले असल्याचे ऍड इस्माईल गवळी यांनी नमूद केले.
डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी संपूर्ण देशातील नागरिकांना एकच मतदान देण्याचा मूलभुत अधिकार दिला असून त्या अधिकाराचा वापर सर्वांनी करावा असे आवाहन डॉ नरेंद्र काळे यांनी केले. या बैठकीत राजकिशोर मोदी यांनी शरदचंद्र पवार यांनी केज मतदार संघात एक सर्वसामान्य माणसाला उमेदवारी दिली असून त्यांच्या विजयासाठी आपण सर्वजण कसोशीने प्रयत्न करून त्यांची विजयश्री खेचून आणू असे आवाहन राजकिशोर मोदी यांनी केले. येणाऱ्या काळात नगर परिषदेच्या माध्यमातून घरकुल योजना प्रभावीपणे राबविण्याचे धोरण अवलंबिनार असल्याचे मोदी यांनी सांगितले. ४० ते ५० वर्षांपासून एकाच ठिकाणी राहणाऱ्या कुटुंबास मालकीत घेण्यासाठी प्रयत्न करू असे आश्वासन राजकिशोर मोदी यांनी यावेळी दिले. मागील काही दिवसांपूर्वी जागा मोजून ताब्यात घेण्यासाठी अंबाजोगाई शहरात मिलिटरीचे अधिकारी आले असतांना त्यांना शहरातून परत पाठविण्याचे काम राजकिशोर मोदी व त्यांच्या सहकाऱ्यांच्या वतीने झाले असून यापुढेही नागरिकांना सर्वस्तरातून मदत करण्यासाठी तत्पर राहू असे अभिवचन राजकिशोर मोदी यांनी शहरवासीयांना दिले. फालोअर्स क्वार्टर परिसरातील बैठकीचे संचलन राजेंद्र मोरे यांनी केले तर आभार विश्वजित शिंदे यांनी मानले.
