अंबाजोगाई

*केज मतदार संघाचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या कडून विकासाचा मास्टर प्लॅन असलेला वचननामा जाहीर*

केज (प्रतिनिधी)
   केज मतदार संघातील राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी अंबाजोगाईला जिल्ह्याचा  व नेकनुरला तालुक्याचा दर्जा मिळवून देण्या सह केज मतदार संघाच्या विकासाचा मास्टर प्लॅन असलेला वचननामा जाहीर केला आहे.
    या वचन नाम्यात पृथ्वीराज साठे यांनी अंबाजोगाईला जिल्ह्याचा  व नेकनुरला तालुक्याचा व नगर पंचायतीचा दर्जा मिळवून देण्या सह अंबाजोगाई शहरातील बुट्टेनाथ साठवण तलाव निर्मिती सह केज, नेकनूर शहराचा पाणी प्रश्न कायम स्वरुपी मिटवणे, नागरिकांना नियमित, मुबलक व स्वच्छ पाणी मिळण्यासाठी विशेष प्रयत्न करणार, मांजरा धरणातील गाळ काढुन पाणी क्षमता वाढवन्या सह काळवीट साठवण तलावाची उंची वाढवण्या साठी प्रयत्न.
   अंबाजोगाई शहरालगत असलेल्या गावामध्ये छोटे छोटे गाव तलाव,
कोरडवाची वाडी, जीवाची वाडी ता. केज येथील साठवण तलावाची निर्मिती, नेकनूर परिसरात साठवण तलाव, गाव तलाव बंधारे माठी पाणी उपलब्ध आहे. त्या सर्व ठिकाणी सिंचनाची व्यवस्था करणे
   स्वा रा ती रुग्णालयातून अद्यावत सुविधा पुरविणे, यंत्र सामुग्री नवीन बसविणे, डॉक्टर्स व कर्मचारी संख्या वाढ करणे, डायलिसिस, न्युरो सर्जरी, हृदय रोग व कैन्सर वरील उपचाराची सुविधा उपलब्ध करणे. केज व नेकनूर येथील रूग्णालयाचा दर्जा वाढवून सर्व प्रकारची रूग्णसेवा, अद्यावत ऑपरेशन थिएटर व तज्ञ डॉक्टर, कर्मचारी वर्ग यांची विशेष व्यवस्था करणे. अंबाजोगाई ते मांजरसुंबा रस्त्यावर अपघात प्रसंगी तात्काळ रुग्ण सेवा देण्यासाठी फिरते रुग्णालय उपलब्ध करणे.
   अंबाजोगाई- घाटनांदूर रेल्वे लाईन  साठी प्रयत्न करणे अंबाजोगाई आणि केज शहरात सिटी बस सुरू करण्या साठी प्रयत्न करून रस्ते अपघात
होणार नाहीत यासाठी उपाय योजना करणे, केज शहराला बाह्य वळण रस्ता निर्माण करून शहरातील वाहतुक कोंडी कमी करण्यासाठी प्रयत्न करणार
   नेकनूर येथील वीज प्रश्न कायम स्वरूपी निकाली काढून सर्व शेतकऱ्यांना 24 तास वीज देण्यासाठी व्यवस्था करणे, अंबाजोगाई, केज, नेकनूर येथे सुसज्ज MIDC निर्माण करणे, तरूणांना रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे.
   केज येथे क्रीडा संकुलाची निर्मिती करणे व अंबाजोगाई येथील क्रिडा संकुलचा विकास करणे, अंबाजोगाई येथे स्पर्धा परिक्षासाठी विशेष केंद्र उभारणी करणे, डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाचे उप-केंद्र व कौशल्य विकास केंद्र कार्यान्वित करून शाळांची क्रीडांगणे, संथालय, विज्ञान प्रयोग शाळा, वसतिगृह यांना सक्षम करणे, विना अनुदान धोरण बंद करावे व जुनी पेन्शन योजना लागू करावी यासाठी प्रयत्न.
   अंबाजोगाई येथे शासकीय आयुर्वेद व दंत अभ्यासक्रमाचे महाविद्यालय सुरू करणे, मुस्लिम विद्यार्थी खास करून मुस्लिम विद्यार्थिनींसाठी स्वतंत्र वसतिगृह स्थापन करणे, महिलांच्या हाताला काम देण्यासाठी लघु उद्योगाची निर्मिती, त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यासाठी विशेष प्रयत्न व नवनवीन उद्योगाची निर्मिती करून महिला सुरक्षेसाठी वर्दळीच्या ठिकाणी सीसीटीव्ही बसवून कायद्याची कडक अंमलबजावणी करण्याचे प्रयत्न करणे
    अंबाजोगाई, केज शहरातील प्रत्येक अल्प व अत्यल्प उत्पन्न गटातील कुटुंबासाठी म्हाडाची घरकुल योजना राबविणे, बे-घरांना जागेसहित घरकुल योजना प्रभावी पणे राबवून त्यांच्या हक्काचा निवारा उपलब्ध करून देणे.
    धनेगाव ता. केज येथे मांजरा धरणाच्या, बाजुला पैठण (नाथसागर) च्या धर्तीवर उद्यान विकसित करणे व अंबाजोगाई, केज, नेकनूर शहरातील नागरिकांसाठी चांगल्या प्रकारचे सुसज्ज उद्यान व नाना-नानी पार्कची निर्मिती करणे
    शेतकयांच्या मालाला चांगला भाव मिळण्यासाठी प्रत्येक जि.प.गटात खरेदी केंद्राची निर्मिती व हंगामी कर्मचाऱ्यासाठी विशेष प्रयत्न, बंद पडलेला अंबाजोगाई शासकीय तालुका दूध संघ पुनर्जीवित करणे, बांधकाम मजुर, क्षेत्र मजूर व इतर सर्व प्रकारे मजुरीची कामे करणाऱ्या सर्व नागरिकांना विमा कवच मिळवून देणार.
   अंबाजोगाई येथील श्री योगेश्वरी देवी मंदिर, श्री रेणुका देवी, श्री मुकुंदराज मंदीर, नागनाथ मंदीर, दासोपंत समाधी, किरमानी दर्ग्या सह मुस्लिम प्रार्थना स्थळाचा पर्यटन दृष्टीने विकास करणे, अंबाजोगाई येथील पुरातन वस्तू संग्रहालय उभा करणे
    केज शहराचा बारामतीच्या धर्तीवर पथ निर्माण, नाल्या, चेंबर आणि पार्किंग झोन करणे, नेकनूर चा विकास आराखडा (डीपी प्लान तयार करून त्या प्रमाणे सर्व आवश्यक प्रभारी विकासकामे करणे. केज व नेकनूर येथे शादीखाना बांधकाम करण्यास निधी उपलब्ध करून देण्यात येईल
   अंबाजोगाई येथे पासपोर्ट कार्यालय आणण्यासाठी प्रयत्न करणार, अंबाजोगाई, केज व नेकनूर येथे सुसज्ज सांस्कृतिक भवन व अंबाजोगाई येथे सुसज्ज डॉ. बाबासाहेब आंबेडकर संविधान भवन उभारणे,
     आदी मुद्दे या नमूद करण्यात आले आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!