*केज तालुक्यातील टाकळी व तांबवा या गावातून पृथ्वीराज साठे यांना एकमुखी पाठिंब्याने पृथ्वीराज साठे यांचे पारडे जड*
केज (प्रतिनिधी):- महाराष्ट्र विधानसभा निवडणूक अंतिम टप्प्यात येऊन ठेपली आहे. प्रचार देखील थांबन्याची वेळ येऊन ठेपली असतांना उमेदवार देखील वन टू वन प्रत्यक्ष भेटी देण्यावर भर देत आहेत. याचाच परिणाम उमेदवाराना मोठया प्रमाणावर दिसून येत आहे. असाच परिणाम महाविकास आघाडीचे केज विधानसभेचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना अनुभवयास मिळाला.
केज तालुक्यातील तांबवा व टाकळी या गावातील नागरिकांचा एकमुखी पाठींबा दिल्याचे जाहीर केले आहे. या दोन्ही गावातील नागरिकांच्या एकमुखी पाठिंब्यामुळे पृथ्वीराज साठे यांचे पारडे जड झाल्याचे चित्र निर्माण झाले आहे.
तांबवा व टाकळी या दोन्ही गावामुळे साठेंच्या मताधिक्य वाढणार आहे. वाढलेल्या मताधिक्याने पृथ्वीराज साठे यांची मतांची लीड देखील वाढली जाणार असून यामुळे त्यांच्या विजयासाठी मोठा हातभार लागणार आहे. तांबवा व टाकळी या केज तालुक्यातील मोठ्या दोन ग्रामपंचायत आहेत . तेथील मतदारांची संख्या देखील मोठया प्रमाणात आहे. या दोन्ही गावांच्या बिनशर्त पाठिंबा मिळण्यासाठी तेथील सरपंच, ग्राम पंचायतचे सदस्य तथा गावातील जेष्ठ नागरिकांनी मेहनत घेतली. व त्याचे फलित हे एकमुखी पाठिंब्याच्या रूपाने पृथ्वीराज साठे यांना मिळाले आहे.
