वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास बेदम चोप देऊन मारहाण केल्या प्रकरणी पाच जण अटकेत
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपशी हात मिळवणी करून प्रचाराच्या नावाखाली पैसे काढल्याचा मनात राग धरून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास बेदम चोप दिल्या प्रकरणी अंबाजोगाई पोलिसांनी पाच जणांना अटक केली असून सर्वांची बीड कारागृहात रवानगी करण्यात आली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, केज विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण याने भाजप कडुन पैसे घेतल्या प्रकरणी संतप्त झालेल्या वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांनी सचिन चव्हाण यांच्या अंगावर ऑइल ओतून बेदम चोप दिला. हा व्हिडीओ सोशल मीडीया वर व्हायरल होताच मा. जिल्हादंडाधिकारी साहेब बीड यांचे जामाबंदी आदेश क्र.2024/गृह विभाग/प्र.कार्यवाही 1/1/मु.पो.का. कलम 1951-239 दिनांक 14/11/2024 चे उल्लंघन केले म्हणून माझी त्यांचे विरुध्द कलम 189(2), 191(2), 191(3), 190, 115(2), 118(1) भारतीय न्याय संहीता, सह कलम 135 महाराष्ट्र पोलीस अधिनियम प्रमाणे अंबाजोगाई शहर पोलीस स्टेशन मधील गोपनीय शाखेत कार्यरत पो हे कॉ संतोष बदने यांनी शहर पोलिसात कायदेशीर फिर्याद दिल्या नंतर सचिन भिमराव चव्हाण रा. बोधीघाट अंबाजोगाई यांचे तोंडाला काळे फासवुन त्यांना चापटाने व वायरने मारहाण केल्याच्या व हा व्हिडीओ व्हायरल केल्या प्रकरणी शैलेद्र बाबुराव कांबळे, गोविंद खंडु मस्के, धम्मानंद रानबा कासारे, जयपाल विष्णु दहीवडे, सतिश पंडीत सोनवणे या सर्वांना अटक करून न्यायालया समोर हजर केले असता न्यायालयाने त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावल्याने सर्वांची रवानगी बीड कारागृहात करण्यात आली आहे.
