*दिग्विजय लोमटे मित्र मंडळाच्या वतीने केज मतदारसंघात मा. पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा जाहीर झाल्याने तरुणांची फळी साठे यांच्या पाठीशी*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
माजी उपनगराध्यक्ष श्री. बबनराव लोमटे यांचे चिरंजीव दिग्विजय लोमटे मित्र मंडळाच्या वतीने केज मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मा. पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा देण्यात आल्याने साठे यांच्या पाठीशी तरुणांची मोठी फळी उभा झाली आहे.
केज मतदार संघांचा निवडणूक प्रचार आता अंतिम टप्प्यात आलेला असून मतदार संघात भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता मुंदडा व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गट व महाविकास आघाडीचे उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांच्यात तुल्यबळ लढत पहावयास मिळत आहे.
साठे यांच्या पाठीशी मतदार संघातील सर्व विरोधी नेत्यांची शक्ती उभारलेली असताना काल अंबाजोगाईचे माजी उपनगराध्यक्ष श्री. बबनराव लोमटे यांचे चिरंजीव दिग्विजय लोमटे यांनी युवक मेळावा आयोजित करून युवकांची मते जाणून घेतली, उपस्थित युवकांशी शिक्षण, रोजगार, पर्यटन आदी विकासाच्या बाबींवर चर्चा करून देशाचे नेते शरदचंद्र पवार यांना ताकत देण्यासाठी केज मतदारसंघातील महाविकास आघाडीचे उमेदवार मा. पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा जाहीर केला.
या प्रसंगी उपस्थित उमेदवार पृथ्वीराज साठे यानी महाविकास आघाडीला पाठींबा दिल्याबद्दल दिग्विजय लोमटे मित्र मंडळाचे आभार मानले या प्रसंगी माजी आ. संगिताताई ठोंबरे, डॉ नरेंद्र काळे, बबनराव लोमटे, तालुका अध्यक्ष अमर देशमुख यासह अनेक पदाधिकारी व्यासपीठावर उपस्थित होते.
