*सेलू आंबा टोल नाक्यावर गोळीबार प्रकरणी रामकृष्ण बांगर सह पाच जणावर पोलिसात गुन्हा दाखल, संदीप तांदळे व अभय पंडित यांच्यावर स्वा रा ती रुग्णालयात उपचार सूरु*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
लातूर रोड वरील सेलू आंबा टोल नाक्यावर गोळीबार प्रकरणी रामकृष्ण बांगर सह पाच जणावर अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून ज्यांच्यावर गोळीबार करण्यात आला ते संदीप तांदळे व अभय पंडित रा. काकडहिरा यांच्यावर स्वा रा ती रुग्णालयात उपचार सूरु आहेत.
या विषयी पोलीस सूत्रा कडुन प्राप्त माहिती अशी की बीड तालुक्यातील काकडहिरा येथील रहिवासी संदीप तांदळे व अभय पंडित हे दोन जन काल रात्री 8 वाजण्याच्या सुमारास स्कारपीओ मध्ये बसून बीड हुन लातूर कडे जात असताना अंबाजोगाई नजीक सेलू आंबा टोल नाक्यावर मागून येणाऱ्या एम एच 44 टी 0011 या
क्रमांकाच्या फॉर्च्युनर मधील व्यक्तीने त्यांचा पाठलाग करून तू नेकनूर पोलिसात आमच्यावर दाखल केलेला गुन्हा मागे घे म्हणत संदीप तांदळे व अभय पंडित यांच्यावर गोळीबार केला.
यात या दोघांच्या ही पायाला गोळी लागल्याने ते जखमी झाले असून दोघांना स्वा रा ती रुग्णालयात उपचारार्थ दाखल करण्यात आले आहे.
या प्रकरणी अंबाजोगाई ग्रामीण पोलिसात दाखल फिर्यादी मध्ये रामकृष्ण बांगर, सौ सत्यभामा बांगर, बाळा बांगर सह पाच जणावर गु र न 352 /2024 कलम 307, आर्म ऍक्ट नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आसुन अधिक तपास पो उ नी अक्षय जगताप हे करत आहेत.
या प्रकरणात आरोपीने वापरलेली बंदूक ही रिव्हॉल्वर होती की घावटी कट्टा होता या विषयी अधिक माहिती मिळू शकली नाही.
