*भाजपशी हात मिळवणी, प्रचाराच्या नावाखाली पैसे काढले, वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास बेदम चोप शहरात खळबळ*
*भाजपशी हात मिळवणी, प्रचाराच्या नावाखाली पैसे काढले, वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास बेदम चोप शहरात खळबळ*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपशी हात मिळवणी करून प्रचाराच्या नावाखाली पैसे काढल्याचा मनात राग धरून वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यास बेदम चोप दिल्याचा प्रकार आज दुपारी अंबाजोगाई शहरात घडल्याने खळबळ उडाली आहे.
या विषयी सविस्तर वृत्त असे की, केज विधानसभा मतदार संघातील वंचित बहुजन आघाडी पुरस्कृत अपक्ष उमेदवार सचिन चव्हाण यांना पक्षात प्रवेश देते वेळीच पक्षाच्या ध्येय धोरणा विषयी कल्पना दिली होती असे असतानाही त्यांनी भाजप सोबत हात मिळवणी करून प्रचाराच्या नावाखाली पैसे काढल्याची गुप्त माहिती वंचित बहुजन आघाडीच्या कार्यकर्त्यांना मिळताच व त्याची खातरजमा करताच काल सकाळी वंचित बहुजन आघाडीचे बीड जिल्हाध्यक्ष शैलेश कांबळे, गोविंद मस्के यांनी सचिन चव्हाण यास अंबाजोगाई शहरातील रमाबाई आंबेडकर चौक येथील कार्यालयात बोलावले व भाजप कडुन पैसे घेतल्या संदर्भात विचारपूस सुरू केली त्यावेळी सचिन चव्हाण हे उडवा उडवीची उत्तरे देऊ लागले. या वेंळी शैलेश कांबळे यांनी पैसे घेतल्याचा पुरावाच त्याच्या समोर ठेवल्याने चव्हाण यांची चांगलीच भंबेरी उडाली या वेंळी संतप्त झालेल्या कार्यकर्त्यांनी सचिन चव्हाण यांच्या अंगावर ऑइल ओतून बेदम चोप दिला.
हा व्हिडीओ सोशल मीडीया वर व्हायरल होताच अंबाजोगाई शहरात एकच खळबळ उडाली असून सचिन चव्हाण याने भाजप सोबत 10 लाख रुपयांचा सौदा केला होता पैकी 5 लाख रुपये त्याला देण्यात आले होते व उर्वरित रक्कम देण्यात येणार होती अशी माहिती शैलेश कांबळे यांनी माध्यमाशी बोलताना दिली.
