*पंकजाताईंचा आदेश पाळून केज मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते देणार नमिताताईंना सर्वाधिक लिड*
*पंकजाताईंचा आदेश पाळून केज मतदारसंघातील भाजपा कार्यकर्ते देणार नमिताताईंना सर्वाधिक लिड*
=======================
केज (प्रतिनिधी)
राज्यात पुन्हा महायुतीची सत्ता आणण्यासाठी पंकजाताईंचा आदेश पाळुन केज मतदार संघातील सर्व भाजपा कार्यकर्ते हे सर्व ताकदीनिशी प्रचारात सक्रिय झाले आहेत. हे कार्यकर्ते नमिताताईंना सर्वाधिक लिड देणार असल्याचे दिसून येत आहे. शुक्रवार, दि.15 नोव्हेंबर रोजी नमिता मुंदडा यांनी केज तालुक्यातील केवड, वरपगाव, शिरपुरा, डोनगाव, कानडी माळी, साबला, धर्माळा, लहुरी, कदमवाडी, सावंतवाडी आणि उमरी या गावांचा झंझावाती प्रचार दौरा केला. सर्वच ठिकाणी त्यांना मतदारांचा उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला.
भाजपा महायुती मित्र पक्षाच्या अधिकृत उमेदवार नमिता अक्षय मुंदडा यांना भाजपाच्या राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंंडे व माजी खा.प्रितमताई मुंडे यांचा आशिर्वाद व कार्यकर्त्यांचे सहकार्य लाभत आहे. नमिता मुंदडा यांच्यासाठी मुंडे भगिनी या केज विधानसभा मतदारसंघात सक्रिय प्रचार करीत आहेत. कार्यकर्त्यांना त्यांना मुंदडांच्या प्रचारात सक्रिय केल्याने आता सर्वाधिक लिड मिळणार अशी चर्चा सर्वत्र ऐकू येत आहे. महायुती सरकारने सर्व सामान्यांच्या हितासाठी लाडकी बहिण, वीज बिल माफी, मोफत अन्नधान्य अशा विविध योजना प्रभावीपणे राबविल्या. तसेच नमिता मुंदडा यांनी केल मतदारसंघात विविध विकासकामांसाठी शेकडो कोटींचा निधी खेचून आणला व मतदारसंघातील अनेक प्रश्न यांची सोडवणूक केली. जे प्रश्न प्रलंबित आहेत. त्यांची सोडवणूक करण्यासाठी नमिता मुंदडा यांना विजयी करण्याचे आवाहन माजी खा.डॉ.प्रितमताई मुंडे यांनी केज तालुक्यातील जनतेला केले. माजी खा.मुंडे यांनी केज तालुक्यातील पिसेगाव, चिंचोली माळी, कोरेगाव, पिंपळगाव, सांगवी, वाघेबाभुळगाव या गावांना भेटी दिल्या. यावेळी त्यांच्यासोबत नमिता मुंदडा तसेच भाजपा महायुतीचे नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
*केज येथील वकिल बांधवांशी नमिता मुंदडा यांनी साधला संवाद :*
विधानसभा निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नमिता मुंदडा यांनी केज येथे वकील संघाचे सन्माननिय पदाधिकारी व सदस्यांशी संवाद साधला. केज मतदारसंघात मागील पाच वर्षात झालेली विविध विकास कामे आणि भविष्यातील धोरणा संदर्भात माहिती दिली. या बैठकीस वकिल संघ केजचे अध्यक्ष, सचिव आणि सदस्य उपस्थित होते. आगामी काळात केज तालुक्यातील वकिल बांधवांचे जे प्रश्न, मागण्या असतील त्या सोडविण्यासाठी आपण कटीबद्ध आहोत असे नमिता मुंदडा यांनी सांगितले.
=======================
=======================
