*मतदारांनी आपली संविधानिक जवाबदारी निवडणूकितील मतदानाच्या माध्यमातून पूर्ण करावी :- खासदार डॉ. फौजिया खान*
अंबाजोगाई(प्रतिनिधी):- देशातील किंवा राज्यातील कोणत्याही निवडणूका या आपसी दुष्मनी व मतभेद बाहेर काढण्यासाठी नसतात तर या निवडणुकांच्या माध्यमातून देशातील जागृत मतदारांची आपली देशाप्रती तथा राज्याप्रति असलेली संविधानिक जवाबदारी पूर्ण करण्यासाठी एक संविधानिक संधी असते. तेव्हा या निवडणुकीच्या माध्यमातून मतदारांनी योग्य उमेदवारास मतदान देऊन आपली जवाबदारी पूर्ण करावी असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा खासदार डॉ फौजिया खान यांनी केले. त्या केज विधानसभा मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरात आल्या असतांना सदर बाजार तथा रविवार पेठ करबला वेस परिसरातून बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर माजी आमदार संगीता ठोंबरे, महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे, डॉ अंजली घाडगे, राजकिशोर मोदी,डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे, बब्रुवान पोटभरे, सौफी मारुफ साहेब, हाजी खालेक, दिलीप काळे, राजेंद्र मोरे, मूनवर भाई, कुचेकर, ऍड इस्माईल गवळी, जहांगीर पठाण, रमिज सर, रौफ बिल्डर, खालेद चाउस, यांच्यासह अनेक जण उपस्थित होते.
केज विधानसभेचे महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारासाठी अंबाजोगाई शहरातील सदर बाजार परिसर तसेच रविवार पेठ करबला वेस परिसरात कॉर्नर बैठकीचे आयोजन करण्यात आले होते . या बैठकीला शेकडोंच्या संख्येने जनसमुदाय उपस्थित होता. या बैठकीतुन अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले. ज्यामध्ये बबन लोमटे, राजेंद्र मोरे, ऍड इस्माईल गवळी, आदींनी आपले विचार मांडत तुमचा आमचा सर्वांचा माणूस पृथ्वीराज साठे यांना बहुमतांनी विजयी करण्याचा निर्धार केला. या बैठकीमध्ये माजी आमदार श्रीमती संगीता ठोंबरे यांनी आपले विचार व्यक्त करतांना सांगितले की आज अनेक ठिकाणी मोठमोठ्या भूलथापां मारल्या जात आहेत. यापूर्वीच्या सरकारने आणलेल्या अनेक कल्याणकारी योजना यावर अतिक्रमण करून सदरील योजना या आम्हीच आणल्या व आम्हीच त्या पूर्ण करत असल्याचा कांगावा करत असल्याचे सांगितले. अशा या ढोंगी व स्वार्थी लोकांना दूर सारण्यासाठी महाविकास आघाडीचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांना विजयी करण्याची साद याप्रसंगी संगीत ठोंबरे यांनी मतदारांना घातली. डॉ अंजली घाडगे यांनी देखील आपले मत व्यक्त करतांना एक साधा सरळ माणूस पृथ्वीराज साठे यांनाच निवडून आणण्यासाठी प्रयत्न शिल राहण्याची विनंती केली.
राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष राजकिशोर मोदी यांनी केवळ पृथ्वीराज साठे यांच्याकडे पाहून त्यांनाच प्रचंड बहुमतांनी विजयी करण्याचे आवाहन केले. पृथ्वीराज साठेंच्या माध्यमातून केज मतदार संघाचा सर्वांगीण विकास साधला जाईल . पिण्याच्या पाण्याचा, सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी एमआयडीसी च्या माध्यमातून मोठे उद्योग उभा करण्यासाठी, अंबाजोगाई जिल्हा तसेच रेल्वे चा प्रश्न सोडवण्यासाठी पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी आपली खंबीर अशी साथ उभा करावी व यासाठी त्यांना विधान भवनात पाठवावे असे मार्मिक आवाहन राजकिशोर मोदी यांनी या बैठकीदरम्यान केले. सौफी मारुफ साहेब यांनी देखील आपल्या भावना व्यक्त करताना कुणाचीही भीती न बाळगता निर्भीडपणे सर्वांनी मतदानाचा हक्क बजावावा अशी विनंती समोर बसलेल्या सर्व हिंदू तसेच मुस्लिम बांधवाना केली. महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांनी सर्व माय बाप जनतेनी आपणास मतदान रुपी आशिर्वाद देऊन विजयी करावे अशी भावनिक साद मतदारांना घातली. सामान्य माणूस हा केंद्रबिंदू म्हणून आपण समाजकारण तथा राजकारण करत असून यापुढेही सर्वसामान्य मतदारांच्या जिव्हाळ्याचे प्रश्न सोडवण्यासाठी मला साथ द्यावी अशी विनंती केली.
महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ आलेल्या खासदार डॉ फौजिया खान यांनी भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी देशाला घालून दिलेल्या संविधानिक अधिकाराचा वापर करून भयमुक्त रित्या मतदान करून आपली जवाबदारी पूर्ण करावी असे आवाहन केले. सत्तेसाठी जातीवादी ताकदीसोबत जाऊन अनेक मोठ्या नेत्यांनी गद्दारी केली. अशा गद्दाराना धडा शिकवन्यासाठी पक्षाशी, आपल्या मतदारांशी एकनिष्ठ असलेले उमेदवार पृथ्वीराज साठे यांनाच बहुमतांनी विजयी करण्यासाठी आपण सर्वांनी प्रयत्न केले पाहिजेत असे आवाहन खासदार फौजिया खान यांनी केले. गेल्या लोकसभेत आपणांस हुकूमशाही मान्य नसल्याचे अवघ्या महाराष्टातील जनतेने एकजुटीने दाखवून दिले आहे. तीच एकजूट ही होणाऱ्या विधानसभा निवडणुकीत देखील दाखवून द्यावी व महाविकास आघाडीचे सरकार स्थापन करण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्व उमेदवार निवडून देण्याची जवाबदारी पूर्ण करण्याचे फौजिया खान यांनी सांगितले. आज राज्यात केंद्र सरकार मधील मोठमोठे नेते येत आहेत. महाराष्ट्रात आलेले कोणतेही नेते विकासावर न बोलता केवळ जातिवादाला खतपाणी घालून येथील वातावरण गढूळ करण्याचा प्रयत्न करत आहेत. तेव्हा महाराष्ट्रातील सर्व सुजाण व सामंजस्य मतदारांनी यांच्या हा जातीवादीचा कुटील डाव हणून पाडण्यासाठी केज विधानसभा मतदार संघाचे महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे याना प्रचंड अशा मतांनी निवडून महाराष्ट्राच्या विधानभवनात पाठवावे असे अवाहन खासदार डॉ फौजिया खान यांनी केले. या कॉर्नर बैठकीला सदर बाजार व करबला वेस रविवार पेठ परिसरातील शेकडोच्या संख्येने युवा, जेष्ठ, तथा महिला मतदार मोठया संख्येने उपस्थित होते.
