*राज्यात पुन्हा एकदा भाजप महायुतीचे सरकार येणार असल्याने केज मतदार संघातुन सौ नमिताताईं मुंदडा यांना विजयी करा – राम कुलकर्णी यांचे आवाहन*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
राज्यात पुन्हा भाजप महायुतीचे सरकार येणार असून केज विधानसभा मतदारसंघाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी पुन्हा एकदा विकासप्रिय व कार्य तत्पर आमदार नमिताताई मुंदडा यांना प्रचंड मतांनी विजयी करा असे आवाहन भाजपा प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी केले आहे.
भाजपा राज्य प्रवक्ते राम कुलकर्णी यांनी मागील काही दिवसांपासून अंबाजोगाई शहरासह केज मतदार संघातील संघ परिवाराला मानणारे कार्यकर्ते, संस्था अंतर्गत कर्मचारी यांच्याशी संवाद साधत केज मतदार संघातील भाजप महायुती च्या उमेदवार सौ नमिता अक्षय मुंदडा यांना विजयी करा असे आवाहन करत आहेत.
हे आवाहन करताना त्यांनी केज मतदार संघातील सर्वधर्मिय समाज बांधवांचा पाठिंबा हा आ.नमिताताई यांना मिळत आसून आमच्या नेत्या पंकजाताई गोपीनाथराव मुंडे याही
मागील काही दिवसांपासून केज मतदारसंघातील विविध भागात प्रचारात सक्रिय आहेत. मीही ज्या-ज्या ठिकाणी प्रचाराला जात आहे तेथील ज्येष्ठ नागरिक, महिला भगिनी व युवक वर्ग आम्हाला उत्स्फूर्त प्रतिसाद देत आहेत. अंबाजोगाई, केज, नेकनूर व येळंबघाट परिसरातील अनेक गावांत जावून आम्ही विविध समाजातील मतदार व नागरिकांशी संवाद साधला.
सौ नमिता मुंदडा यांनी मागील 5 वर्षात मतदार संघातील प्रत्येक गावात सिमेंट रस्ते व नाल्यांची कामे पूर्ण केली आहेत. अनेक ठिकाणी ही कामे प्रगतीपथावर आहेत. सर्व समाज हा आ.नमिताताई मुंदडा लोकप्रतिनिधी म्हणून त्यांच्या कामगिरीवर खुष व समाधानी आहे. असे आम्हाला दिसून आले. अंबाजोगाई शहरातील विविध प्रभागात प्रचारानिमित्त मतदारांशी संवाद साधला असता लोक सांगतात की, आमदार नमिताताई व संपूर्ण मुंदडा परिवार यांनी कधी ही जात-पात न पाहता आमच्या भागाचा विकास केला. त्यामुळे आमची मतंही विकासाच्या नांवाखाली मुंदडा यांनाच जाणार आहेत. असे सुजाण मतदार स्वतःच सांगत आहेत.
केज विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सौ.नमिताताई मुंदडा, ज्येष्ठ नेते काकाजी, युवा नेते अक्षय भैय्या यांनी मागील दोन वर्षांतच अंबाजोगाई शहराचा चेहरा – मोहरा बदलला आहे. त्यांनी अंबाजोगाई शहर व परिसरातील गेली अनेक वर्षांपासून रस्ते, पाणी, वीज, नाल्यांपासून ज्या भागाचा मुलभूत विकास झाला नव्हता. जिथे गोरगरीब, कष्टकरी, श्रमजीवी, कामगार बांधव जिथे राहतात. त्या भागात आमदार नमिताताई मुंदडा यांनी लाखो नव्हे तर करोडो रूपयांचा विकास निधी देऊन त्या ही परिसराचा चेहरा – मोहरा बदलुन कायापालट केला आहे. एवढा मोठा विकास यापूर्वी अंबाजोगाई नगरपरिषद हद्दीत कधीच झाला नाही. आ.मुंदडा यांनी केलेल्या विकास कामांमुळे आता ती दरी भरून निघाली आहे. त्यामुळे अंबाजोगाई शहरच नव्हे तर अंबाजोगाई, केज, नेकनूरसह ग्रामीण भागातील सर्वधर्मिय समाजातील अनेक धार्मिक स्थळे, रस्ते, नाल्या व स्मशानभूमीच्या परिसराचा विकास करण्यासाठी भरीव निधी मिळाल्याने ओन्ली आमदार नमिताताई मुंदडा असा गजर होताना दिसत आहे. त्यामुळे सर्व समाजाचा सर्वांगिण विकास करण्यासाठी सतत कार्यरत असलेल्या व विकासाच्या बाबतीत केज विधानसभा मतदारसंघाचा चेहरा - मोहरा बदलणाऱ्या नमिताताई मुंदडा यांना पुन्हा एकदा विजयी करावे असे आवाहन राम कुलकर्णी यांनी केले आहे.
=======================
=======================
