*सौ नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ व्युव्हरचना जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा यांची तरी प्रत्यक्षात खिंड लढवण्याचे काम अक्षय मुंदडा करतायंत*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघाच्या भाजप महायुतीच्या उमेदवार सौ नमिता मुंदडा यांच्या प्रचाराची व्युव्हरचना जरी जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आखत असले तरी प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरून खिंड लढवण्याचे काम मात्र अक्षय मुंदडा हे करताना दिसत आहेत.
मागील 30 वर्षात स्व विमलताई मुंदडा असो की मागील पंचवार्षिक काळात आ नमिताताई मुंदडा व सोबतीला अक्षय मुंदडा असो मंत्रालय पातळी वर ही मंडळी जरी विकास कामे खेचून आणण्यासाठी प्रयत्न करत असली तरी ग्राउंड लेवलला जे काम आहे ते नंदकिशोर मुंदडा उर्फ काकाजी यांचं, कोणाच लग्न असो, वास्तुशांती असो, कोणाचा अंत्यविधी असो, कोणाचे दवाखाण्याचे काम असो की कोणाचे एम एस ई बीचे काम असो काकाजी मदतीला धावतात हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. आणि हेच ग्राउंड लेवल ला काम करताना अनावधानाने काही चुका झाल्या वर जी नाराज मंडळी होते तीच मंडळी मुंदडा परिवारावर चुकीचे आरोप करताना आपण पाहतो.
मात्र आज मतदार संघात सौ नमिता मुंदडा यांच्या विरोधात सर्व विरोधक एक झालेले असतानाच नमिता मुंदडा यांचा विजय खेचून आणण्यासाठी अक्षय मुंदडा हे खऱ्या अर्थाने खिंड लढवत असून मतदार संघातील याच नाराज मंडळीची नाराजी दूर करून त्यांना आपलंसं करण्यात अक्षय मुंदडा यांना यश आलेले आहे हे मात्र निश्चित.
सौ नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ अक्षय मुंदडा हे दिवस रात्र एक करून मतदार संघातील वाड्या तांड्या पर्यंत पोचत आहेत, विरोधका कडुन होत असलेल्या टिकेला उत्तर देत अक्षय मुंदडा हे विरोधकांचा चांगलाच समाचार घेणे सुरू केले असून अक्षय मुंदडा यांनी रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांच्या सभेत केलेले भाषण आणि विरोधकांवर केलेली सडकून टीका ही आज चर्चेचा विषय ठरल्या गेली आहे.
यावेळी ते खासदार बजरंग सोनवणे यांच्यावर टीकास्त्र सोडताना म्हणाले की आपल्या बापाच्या जीवावर खाजगी गुत्तेदारीच्या माध्यमातून मोठं गबाळा कमावून त्यांच्याच विरोधात कटकारस्थान करणाऱ्या खासदारांनी आपल्याला राजकारण कसे करावे हे शिकवू नये. आपण गुत्तेदारी करतांना अवैध रितीने पैसै कमवतांना कोणकोणते धंदे केले आहेत याची मोठी यादी आपल्याकडे आहे ती यादी आपण सांगायला चालू केली तर मतदार संघात तोंड दाखवायलाही जागा शिल्लक राहणार नाही.
यावेळी राजकिशोर मोदी यांच्यावर टीकास्त्र सोडताना अक्षय मुंदडा म्हणाले की, अंबाजोगाई शहरात स्वतः ला विकास पुरुष म्हणून घेणारे परवा आपल्या भाषणात आ. नमिता मुंदडा यांनी अंबाजोगाई शहर वासियांवर दीड कोटी रुपयांचा बोजा टाकला असे म्हणाले. मी या माध्यमातून विकास पुरुष आणि तुम्हाला ही स्पष्टपणे सांगू इच्छितो तो की, ज्या बोजाचा उल्लेख हे विकास पुरुष करताहेत तो बोजा आ. नमिता मुंदडा यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना या शहराची परिस्थिती सांगितल्यानंतर स्वतः उचलला तो शहर वासीयांवर पडू दिला नाही.
विकास पुरुषांनी परवा आपल्या भाषणात मुंदडा परिवाराचा उल्लेख मुंदडा कन्स्ट्रक्शन कंपनी असा केला. मी आपल्या सांगू इच्छितो की, राजकारणात मुंदडा परीवार गेली ४० वर्षांपासून सक्रिय आहे. या ४० वर्षाच्या कालावधीत मुंदडा परिवारातील एकाही सदस्याने कोणत्याही शासकीय कार्यालयातुन एक नवा पैशाची गुत्तेदारी केल्याचे व बील उचलल्याचे दाखवावे, आपण राजकारण सोडून देवू. याउलट विकास पुरुषाने आपली नगर परीषदेवर सत्ता असतांना मात्र शहरातील रस्ते सोडून आपल्या व्यावसायिक जमिनीत रस्ते केल्याची अनेक उदाहरणे सांगता येतील अशी घणाघाती टिका ही यावेळी केली.
कोणतेही शासकीय काम हे उच्च दर्जाचे व चांगलेच झाले पाहिजे हा नमिता मुंदडा यांचा आग्रह असतो. त्यांचे हे काम जर विकास पुरुषाला मुंदडा कन्स्ट्रक्शन कंपनी वाटत असेल तर ते त्यांचे अज्ञान आहे.
विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर विरोधक खालच्या पातळीवर आरोप मुंदडा परीवारावर करत असताना सौ नमिता मुंदडा यांच्या प्रचाराची व्युव्हरचना जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा हे आखत असून
प्रत्यक्षात निवडणूक रिंगणात उतरून
कसल्याही प्रकारची आक्रमकता आणि चिडचिडेपणा न करता खिंड लढवण्याचे काम मात्र अक्षय मुंदडा हे करताना दिसत आहेत.
