अंबाजोगाई

*परळी विधानसभा मतदार संघा मध्ये एकच नारा घुमतो आहे आणि तो म्हणजे “एक लाख लिडसे धंनजय मुंडे फीर से”*

*परळी (प्रतिनिधी)*
*परळी विधानसभा मतदार संघातील प्रचार आता शिगेला पोचला असताना  मतदारांनी विकासाला मतदान देण्याचा निर्धार करत एकच नारा देण्यास सुरवात केली आहे आणि तो म्हणजे  “एक लाख लिडसे धंनजय मुंडे फीर से” या मुळे धंनजय मुंडे यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.*
*परळी विधानसभा मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे महायुतीचे उमेदवार राज्याचे कृषी विकास मंत्री मा धंनजय मुंडे व राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे महाविकास आघाडीचे उमेदवार राजेसाहेब देशमुख यांच्यात सरळ लढत होत असून मागील 5 वर्षात धंनजय मुंडे यांनी केलेल्या मतदार संघातील विकास कामाच्या शिदोरीवर धंनजय मुंडे यांची  प्रचार यंत्रणा सर्वत्र कार्यरत झाली असून घटक पक्ष असलेल्या महायुतीच्या नेत्या मा आ पंकजाताई मुंडे, डॉ प्रीतमताई मुंडे यांच्या सह मुख्यमंत्री शिवसेना एकनाथ शिंदे गटाची यंत्रणा ही धंनजय मुंडे यांच्या प्रचारार्थ सक्रिय झाली आहे.*
*परळी मतदार संघातील केवळ परळी शहरच नव्हे तर सिरसाळा, पट्टीवडगाव, बरदापूर, राडी, सायगांव,  धानोरा व परिसरातील पंचक्रोशी मध्ये मा धंनजय मुंडे यांच्या पाठीशी सर्व सामान्य जनता मोठ्या प्रमाणावर आपला पाठिंबा व्यक्त करत असून धंनजय मुंडे यांचा सर्वच जाती धर्मात वयक्तिक जनसंपर्क असल्याने व सर्वांच्या सुख दुःखात धाव असल्याने या मतदार संघात कुठलाही जातीचा फॅक्टर चालणार नसल्याने मतदार बोलत आहेत.*
*एकूणच परळी विधानसभा मतदार संघातील प्रचार आता शिगेला पोचला असताना मतदारांनी विकासाला मतदान देण्याचा निर्धार व्यक्त केला असून एकच नारा देण्यास सुरवात केली आहे आणि तो म्हणजे  “एक लाख लिडसे धंनजय मुंडे फीर से” या मुळे धंनजय मुंडे यांचा विजय निश्चित मानल्या जात आहे.*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!