*लातूर बीड सरहद्दी मधील बर्दापुर – अंबाजोगाई या चार पदरी रस्त्याचे काम प्रगती पथावर आसून ते 6 महिन्यात प्रत्यक्षात सुरू होईल. मी माझा वादा पूर्ण करतो तुम्ही नमिता ताई मुंदडा यांना विजयी करून तुमचा वादा पूर्ण करा* *केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांचे उदगार*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
स्व. गोपीनाथ मुंडे व प्रमोदजी महाजनांचे कार्य मला प्रेरणा दायी आसून माझे स्व. विमलताईशी जवळचे संबंध होते, राजकारणात चांगले लोक आले पाहिजेत, त्या लोकांना विकासाचे प्रश्न समजले पाहिजेत. नमिता मुंदडा या विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
लातूर बीड सरहद्दी मधील बर्दापुर ते अंबाजोगाई हा चार पदरी रस्त्याचे काम प्रोसेस मध्ये आसून ते 6 महिन्यात सुरू होईल. मी माझा वादा पूर्ण करतो तुम्ही नमिता ताई मुंदडा यांना विजयी करून तुमचा वादा पूर्ण करा असे आवाहन
केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना.नितीन गडकरी यांनी केले.
भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई येथे आयोजित भव्य जाहीर सभेत मा ना नितीनजी गडकरी हे बोलत होते. या प्रसंगी
भाजपा राष्ट्रीय सचिव आ.पंकजाताई मुंडे, माजी खा डॉ प्रीतमताई मुंडे, यांच्यासह भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा, ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा भाजप प्रवक्ते राम कुलकर्णी, रमाकांत मुंडे, डॉ सुधीर धर्मपात्रे, सारंग पुजारी, सुरेश कराड, डॉ वासुदेव नेहरकर, राजेश्वर चव्हान, विजयकांत मुंडे, संतोष हंगे, अनंत लोमटे, संजय गंभीरे, बालासाहेब दौडतोले, दिलीप सांगळे, वाजेद खतीब,
शेख रहीम, राणा डोईफोडे, विष्णू चाटे, नेताजी शिंदे, डॉ अतुल देशपांडे, श्रीमती शोभाताई लोमटे यांची प्रमुख उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना मा ना नितीन जी गडकरी पुढे म्हणाले की, महाराष्ट्राचे भविष्य बदलणारी विधान सभेची निवडणूक आहे, 75 वर्षात 60 वर्ष काँग्रेसचे सरकार होते. काँग्रेस ने गरिबी हटावचा नारा दिला मात्र गरीबी हटली नाही चुकीच्या आर्थिक धोरणा मुळे राज्याच वाटोळे झाले. देशाच्या विकासासाठी इमानदारीने कामे करणारांची कमी आहे. बीड जिल्ह्यात 10 हजार कोटींची कामे केली, माझ्या कडे पैशाची कमी नाही. 60 वर्षात जी कामे झाले नाहीत ते 10 वर्षात आम्ही विकास कामे करून दाखवली.
अटल बिहारी वाजपेयी यांच्या मुळे सुरू केलेल्या पंतप्रधान ग्राम सडक योजने मध्ये अनेक खेडी जोडण्याचे कामे केले. शेतकऱ्या साठी सिंचन व्यवस्था केली. आज पाण्याचा मुद्दा महत्वाचा आहे. त्यासाठी नदी जोड योजना सुरू केल्या. विविध योजने मधून 2 लाख हेक्टर पेक्षा जास्त सिंचना खाली आली.
शेतकरी अन्नदाता नाही तर तो ऊर्जा दाता झाला पाहिजे हे आपलं स्वप्न आहे. येथुन पूढे इथोनॉल वर चालणाऱ्या कार्स मार्केट मध्ये येणार आहे, स्मार्ट शहर नाही तर स्मार्ट खेडी व्हायला हवी. योग्य धोरणे असतील तरच विकास होऊ शकतो. विकास करताना कधीही भेदभाव केला नाही माणुस जातीने मोठी नाही
जात पंथ विरहित समाज व्यवस्था निर्माण व्हायला हवी, भारत हा विश्व गुरू बनवणे हे भाजपचे उद्दिष्ट आसून त्या दृष्टीने पावले टाकली जात आहेत.
राष्ट्राच्या विकासा साठी सुशासन असलं पाहिजे, ज्या दिवशी या देशातील प्रत्येक व्यक्तीला रोटी कपडा मिळेल त्यावेळी आपल काम पूर्ण झाल असं होईल.
घटनेचे मूल तंत्र कधीच कोणीही बदलू शकत नाही. डॉ बाबासाहेबांचं संविधान कधी बदलणार नाही कोणी बदलू शकणार नाही विरोधका कडुन चुकीचा गैरसमज पसरवला जात आहे.
महाराष्ट्राचा विकास करायचा असेल तर या राज्यात शिवशाही व रामराज्य यायला हवं.
स्व. गोपीनाथ मुंडे व प्रमोदजी महाजनांचे कार्य मला प्रेरणा दायी आसून माझे स्व. विमलताईशी जवळचे संबंध होते, राजकारणात चांगले लोक आले पाहिजेत, त्या लोकांना विकासाचे प्रश्न समजले पाहिजेत. नमिता मुंदडा या विकासाची दृष्टी असलेल्या उमेदवार आहेत त्यांना प्रचंड मतांनी विजयी करा.
लातूर बीड सरहद्दी मधील बर्दापुर ते अंबाजोगाई हा चार पदरी रस्त्याचे काम प्रोसेस मध्ये आहे ते 6 महिन्यात सुरू होईल. मी माझा वादा पूर्ण करतो तुम्ही नमिता ताई मुंदडा यांना विजयी करून तुमचा वादा पूर्ण करा असे आवाहन या वेळी गडकरी यानी मतदारांना केले.
या वेळी बोलताना पंकजाताई मुंडे म्हणाल्या की, येथील मतदार भाजप विचारांचा आहे, मुंडे साहेबांनी एक एक माणूस जोडण्याचे काम केले. केजची प्रतिष्ठेची जागा आहे, मी लोकसभेला मताने हरले तरी मनाने हरले नाही, मुंडे साहेब आमदार बनवणारी फॅक्टरी होते. आपण जात पात धर्म बाजूला ठेऊन कमळाच्या फुलाला विजयी करायचं आहे. भाजपने कुठलीही योजना देताना कधीही जात पात पाहिली नाही. तुमच्या हातात सरकार होते त्या वेळी का योजना दिल्या नाहीत असा सवाल त्यांनी आघाडी च्या नेत्यांना केला.
मी लोकसभेचा पराभव विसरून गेले. भविष्याचा विचार करून तुम्ही मला मान द्या मी तुम्हाला मान देईल.
मी नमिता मुंदडा यांना दत्तक घेते, आमदार होऊन मतदार संघ तर अगोदरच घेतला आहे.
उसाची चिंता करायची नाही वैद्यनाथ कारखाना 14 नोव्हेंबरला गाळपाचे पहिले पाऊल टाकणार आहे. कारखाना सुरू होणार आहे. पणगेश्वर सुद्धा सुरू होणार आहे. केजची सीट निवडून आणून सीट महायुतीच्या झोळीत टाकण्या साठी नमिता मुंदडा याना विजयी करा असे आवाहन या वेंळी त्यांनी केले.
या वेळी बोलताना सौ नमिताताई मुंदडा म्हणाल्या की, मी गडकरी साहेबाना माझं आयडल मानते, मी स्व. मुंडे साहेब, प्रमोद महाजन यांचा आदर्श ठेऊन काम करते. आमचं अंबाजोगाई जिल्ह्याचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी ताकत देऊन आंबाजोगाई बरदापुर रस्ता चार पदरी करण्या साठी फंड उपलब्ध करून द्यावेत.
या वेळी विरोधकावर तोफ डागताना अक्षय मुंदडा म्हणाले की, मागील 5 वर्षात जी कामे झाली ती सर्व कामे आपल्या समोर आहेत, डॉ प्रीतमताई मुंडे यांनी गडकरी साहेबांना जी कामे सांगितले ती कामे त्यांनी केले पठाण मांडवा येथुन येणारा व अक्कलकोटला जाणारा रस्ता ही लवकर होणार आहे. पंकजाताई ग्राम विकास मंत्री असताना त्यांच्या माध्यमातून अनेक विकास कामे बीड जिल्ह्यात झाली. 2014 मध्ये पराभव झाला मतदार संघाचा विकास खुंटला,
विकासाचे कामे करताना दूरदृष्टी हवी म्हणून लोखंडी सावरगाव येथे दवाखाना काढला, तो कोव्हिडं काळात वरदान ठरला. आम्ही केवळ काम आणत नाही तर कामे करून दाखवतो.
माझ्या पेक्षा आई वडिलांनी खासदारावर जास्त प्रेम त्यावेळी केले. मी आजही खासदारांना बप्पा म्हणतो त्यांच्या सारख्या गप्पा मारत नाही. मी राजकारणात आलो ते लोकांचा विकास करण्यासाठी. यांच्या बाबत बोलायचं ठरलं तर तुम्हाला फिरणे मुश्किल होईल. पापा मोदी यांच्यावर टीका करताना ते म्हणाले की 25 वर्षापासून आपलं ओझं अंबाजोगाईला झालं आहे.
या प्रसंगी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित होते.
