*केज विधानसभा मतदार संघातील ग्रामीण तथा शहरी मतदारांच्या तोंडी रामकृष्ण हरी वाजवा तुतारीचाच नारा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- केज विधानसभा मतदार संघाची निवडणूक ही दिवसेंदिवस रंगात येऊ लागली आहे. अवघ्या आठ ते नऊ दिवसांवर येऊन ठेपलेली ही निवडणूक आता कुण्या पक्षाच्या किंवा कुठल्या नेत्याच्या हातात राहिली नसून ती जनतेने आपल्या हातात घेतल्याचे चित्र सर्वत्र दिसून येत आहे. अंबाजोगाई शहरातील भाजपा, मुख्यमंत्री शिंदेंची शिवसेना वगळता सर्व पक्षीय नेते हे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विजयी प्रचारार्थ कामाला लागल्याचे दिसून येऊ लागले आहे. त्यामध्ये राजकिशोर मोदी,डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे, मनोज लखेरा,महादेव आदमाणे, दिनेश भराडीया,धम्मा सरवदे,अमोल लोमटे, शिवसेनेचे श्रीधर गरड, अशोक हेडे, आरपीआयचे दीपक कांबळे, रमेश गायसमुद्रे, समाजवादी पक्षाचे ऍड शिवाजी कांबळे, परदेशी, युवा सेनेचे अक्षय कदम, विष्णू धायगुडे, निलेश जाधव,ऍड भीमसेन लोमटे, ऍड इस्माईल चौधरी, काझी खयामोद्दीन, यांच्यासह मित्रपक्षाचे अनेक सहकारी मित्र त्याचबरोबर महिला पदाधिकारी देखील मोठ्या प्रमाणावर सहभागी झाल्याचे सर्वत्र दिसून येत आहे .
केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाई शहरातील सोमवार दि ११रोजी मुकुंदराज कॉलनी, पेन्शनपुरा, सदर बाजार, फोलोवर्स कॉर्टर, पंचशील नगर, मोची गल्ली, मिलिंद नगर , गवळीपुरा भागात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रचारफेरीदरम्यान शेकडोंच्या संख्येने कार्यकर्ते, पदाधिकारी , युवक तथा जेष्ठ नागरिक यांच्यासह अनेक नवमतदार सहभागी झाले होते. यावेळी प्रत्येक मतदारांच्या घरोघरी प्रत्यक्ष भेटी दिल्या असतांना यावेळी आम्हि फक्त शरद पवारांची निशाणी असलेली तुतारीच वाजवणार असा शब्द देत होते. मतदारांच्या अशा उत्साहाकडे पाहून प्रचार फेरीतील नेतेगण देखील आनंदाने द्विगुणीत होत होते व त्यांच्या अंगी एक नवीन ऊर्जा निर्माण होत होती.
मागच्या तीन दिवसात राजकिशोर मोदी यांच्या अनेक सहकार्यांनी तसेच सर्वपक्षीय नेत्यांनी अर्ध्या पेक्षा जास्त अंबाजोगाई शहर स परिसर पिंजून काढला आहे. ज्यामध्ये डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक, बलुतेचा मळा, कुत्तर विहीर, भट गल्ली, जैन गल्ली, कोठाड गल्ली, झारे गल्ली, धनगर गल्ली, बाराभाई गल्ली, दमगाण पुरा,मणियार गल्ली, भोई गल्ली, बागवान गल्ली, सातपुते गल्ली, मंडी बाजार परिसर या भागात प्रचार रॅलीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी पृथ्वीराज साठे हे एक तुमच्या आमच्या तीलच एक सर्वसाधारण माणूस असून त्यांच्याशी जनसामान्याची मने जुळली गेली आहेत. त्यामुळे पृथ्वीराज साठे यांनाच तुतारी वाजविणारा माणूस या चिन्हसमोरील बटन दाबून प्रचंड मतांनी विजयी करण्याचे आवाहन मतदारांना प्रचार रॅलीद्वारे करण्यात येत होते. रॅलीचा समारोप पंचशील नगर येथे करण्यात आला. समारोप प्रसंगी कॉ बब्रुवाहन पोटभरे यानी जातीवादी शक्तींना रोखण्यासाठी महाविकास आघाडीचे सर्वसामान्य कुटुंबातील एक साधारण व्यक्तिमत्त्व पृथ्वीराज साठे यांना आपले बहुमूल्य असे मतदान करण्याचे आवाहन पोटभरे यांनी केले .
या रॅलीमध्ये राजेंद्र मोरे,चंद्रकांत महामुनी, बबन पानकोळी, अंकुश हेडे, सुभाष पाणकोळी ,व दत्ता सरवदे, जावेद गवळी, रफिक गवळी, विशाल पोटभरे, शाकेर काझी, अकबर पठाण, अशोक देवकर, रशीद भाई, सुदाम देवकर,सचिन जाधव, माऊली मादळे, सलीम चौधरी, सय्यद अमजद, सय्यद ताहेर,संतोष माने, महेश वेदपाठक, शुभम लखेरा,शरद काळे, यश अलझेंडे, शंकर साठे,यांच्यासह अनेक सहकारी कार्यकर्ते सहभागी झाले होते.
