*आ. नमिता मुंदडा यांच्या समर्थनार्थ सोहेल कुरुशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांचा भाजपात प्रवेश*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
आ. नमिता मुंदडा यांच्या समर्थनार्थ सोहेल कुरुशी यांच्या नेतृत्वाखाली शेकडो मुस्लिम कार्यकर्त्यांनी नुकताच भाजपा मध्ये प्रवेश केला असून ते आ. नमिता मुंदडा यांच्या विजयासाठी सक्रिय झाले आहेत.
विधानसभा सभा निवडणुकीचा प्रचार आता काही दिवस शिल्लक राहिला असल्यामुळे हा प्रचार आता शिगेला पोहोचला आहे. केज विधानसभा मतदारसंघातील अठरापगड जातींचे कार्यकर्ते आ. नमिता मुंदडा यांच्या प्रचारासाठी कामाला लागले असतांनाच भारतीय जनता पक्षाचे राजकीय विरोधक समजल्या जाणाऱ्या मुस्लिम समाजाच्या कार्यकर्त्यांची
आ. नमिता मुंदडा सह ज्येष्ठ मार्गदर्शक
नंदकिशोर मुंदडा व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या वर असलेल्या विश्वासामुळे इनकमिंग मोठ्या प्रमाणावर होत आहे.
मुस्लिम समाजाचे तरुण कार्यकर्ते सोहेल कुरेशी यांच्या नेतृत्वाखाली अक्षय मुंदडा यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाजाच्या शेकडो कार्यकर्त्यांनी काल भाजपामध्ये नुकताच प्रवेश केला.
या प्रसंगी बोलताना अक्षय मुंदडा म्हणाले की, भारतीय जनता पक्ष हा राष्ट्रीय पक्ष असून तो सर्वधर्म समभाव विचार घेवून चालणारा पक्ष असून जे मुस्लिम बांधव राष्ट्रविचारसरणीचे आहेत त्यांच्या सोबत भारतीय जनता पक्ष हा सतत पाठीमागे राहिला आहे. केज विधानसभा मतदार संघातील ही होवू घातलेली विधानसभा निवडणुक जातीपातीच्या मुद्दा पेक्षा विकासाच्या मुद्यावर लढली जात असल्यामुळे या विभागातील सर्व समाजातील मतदार हा आ. नमिता मुंदडा यांच्या पाठीशी उभा असून या मतदारांना आम्ही कधीही अंतर देणार नाहीत असेही ते म्हणाले.
आ. नमिता मुंदडा यांनी केलेली विकासकामे ही मतदारसंघाचा आणि अंबाजोगाई शहराचा कायापालट करणारी आहेत. त्यांच्या या विकासात्मक दृष्टिमुळेच आज शेकडो कार्यकर्त्यांनी आ. नमिता मुंदडा यांच्या मागे आपली संपूर्ण शक्ती उभी करुन त्यांना विजयी करण्याचा संकल्प
केला असल्याचे या वेळी सोहेल कुरेशी
म्हणाले.
