*अंबाजोगाई आगार प्रमुखाचा कारभार म्हणजे “आंधळ दळत कुत्र पिठ खात” अशी*
*आगार प्रमुखा सह येथील अधिकारी कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत का*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
उत्पन्नाच्या बाबती मध्ये अव्वल क्रमांक पटकावलेल्या अंबाजोगाई अगाराच्या नादुरुस्त बसेस लाईन वर पाठवल्या जात असल्याने त्या रस्त्या मध्ये कुठेही बंद पडत असून आगार प्रमुखाचा कारभार “आंधळ दळत कुत्र पिठ खात” अशी अवस्था झाली असून या प्रकारातून आगार प्रमुखा सह येथील अधिकारी कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे.
अंबाजोगाई आगार हा बीड जिल्ह्यात सर्वाधिक उत्पन्न देणारा आगार, जिल्ह्यात सर्वाधिक बसेस अंबाजोगाई बस स्थानका मधून धावतात. काही महिन्या पूर्वीच अंबाजोगाई आगाराने उत्पन्नाच्या बाबती मध्ये विभागात अव्वल क्रमांक पटकावला होता तर बस स्थानक परिसरात व्यवस्थित चालता ही येत नाही अशी अवस्था असताना स्वच्छतेच्या बाबत अंबाजोगाई बस स्थानकाने राज्यात प्रथम क्रमांक मिळवून 10 लाख रुपयांचे परितोषक मिळवले होते, हे 10 लाख मिळताच आगार प्रमुखासह कामगारांनी रंगीत संगीत डीजे लावून मिरवणूक ही काढली होती. बाकी 10 लाख कुठे कारणी लागले माहीत नाही मात्र आज आज अंबाजोगाई आगाराची अवस्था आंधळं दळत आणि कुत्र पीठ खात अशी झाली आहे.
अंबाजोगाई आगारातून बाहेर पाठवल्या जाणाऱ्या 100 पैकी 80 बसेस या नादुरुस्त अवस्थेत असतात आगारातील मेकॅनिक विभागतील कामगार अशा नादुरुस्त बसेस थातूर मातूर कामे करून लाईन वर पाठवल्या जातात.
अनेक बसेसचे एक्सलचे नट गेलेले आहेत, हे नट सुद्धा टाकल्या जात नाहीत. अनेक गाड्याच्या काचा फुटलेल्या आहेत, अनेक गाड्याचे पत्रे केवळ लोंबत नाहीत तर गाडी मध्ये बसताना दरवाजाचे पत्रे देखील निघालेले आहेत जे की प्रवाशांना गाडीत बसताना जीव घेणे ठरू शकतात.
चालक वाहकांची ईच्छा नसतानाही लाईन वर पाठवल्या जात असलेल्या गाड्या मध्ये ना जॅक स्टूल किट असते ना स्पेअर टायर असतात. लाईन वरील बहुसंख्य गाड्याना 10.20 च्या टायर ला 9.20 चे ट्यूब लावून गाड्या बाहेर पाठवल्या जातात. त्या मुळे पंक्चर चे प्रमाण मोठ्या प्रमानावर वाढले आहे.
एकूणच मेकॅनिक विभागाचे प्रमुख (ए डब्लू एस) धस यांचा मेकॅनिकल विभागातील कामगारांवर वचक नाही त्यामुळे त्यांचे कामावर लक्ष नाही.
आगारातील जबाबदार वाहतूक निरीक्षक (टी आय) पल्लेवाड हे काही चालक वाहका सोबत पार्ट्या करून
कर्मचाऱ्यांना भेदभावाची वागणूक देतात आणि या सर्व यंत्रणेवर लक्ष ठेवण्याची ज्यांची जबाबदारी आहे असे आगार प्रमुख राऊत यांचा यंत्रणेवर काडी मात्रही वचक राहिला नसल्याने
लाईन वर पाठवल्या जात असलेल्या बसेस रस्त्या मध्ये कुठेही बंद पडत असून आशा नादुरुस्त बसेसमुळे कोणत्या वेळी कोणत्या बसेसचा अपघात होईल आणि कोणाचा बळी जाईल याचा काडी मात्र भरोसा राहिला नसून आगार प्रमुखाचा कारभार म्हणजे “आंधळ दळत कुत्र पिठ खात” अशी अवस्था झाली आहे. या प्रकारातून आगार प्रमुखा सह येथील अधिकारी कामगार व प्रवाशांच्या जीवाशी खेळतायत का असा प्रश्न उपस्थित होतो आहे हे मात्र निश्चित.
