*भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा*
*भाजपा महायुतीच्या उमेदवार नमिता मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवारी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाचे मंत्री ना.नितीन गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे.
केज विधानसभा मतदारसंघ सार्वत्रिक निवडणुक २०२४ निमित्त भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार सौ.नमिता अक्षय मुंदडा यांच्या प्रचारार्थ अंबाजोगाईत मंगळवार, दिनांक १२ नोव्हेंबर रोजी सकाळी ११.३० वाजता श्री शंकर महाराज वंजारी विद्यार्थी वसतिगृह येथे देशाचे केंद्रीय रस्ते विकास आणि महामार्ग मंत्री आदरणीय ना.नितीनजी गडकरी, भाजपा राष्ट्रीय सचिव, लोकनेत्या आ.पंकजाताई मुंडे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. अशी माहिती केज भाजपा महायुतीच्या वतीने देण्यात आली आहे. तरी या सभेसाठी भाजपा, शिवसेना (शिंदे गट), राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी (अजित पवार गट), रिपाइं (आठवले गट) आणि महायुतीच्या घटक पक्षांचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते आणि नागरिकांनी बहुसंख्येने उपस्थित रहावे अशी नम्र विनंती व आवाहन ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा, युवा नेते अक्षय मुंदडा व केज विधानसभा मतदारसंघ भाजपा महायुतीच्या वतीने करण्यात आले आहे.
======================
=======================
