अंबाजोगाई

मसाप केंद्रीय कार्यकारणी निवडणुकीत दगडू लोमटे यांचा २३४२ मते घेवून विक्रमी विजय

 

अंबाजोगाई – मराठवाडा साहित्य परिषद छञपती संभाजीनगर यांच्या २२ जागांसाठी कार्यकारी मंडळाची निवडणूक पूर्ण झाली. मतमोजणी ९ नोव्हेंबर रोजी पर पडली यात अंबाजोगाईचे दगडू लोमटे यांना एकूण झालेल्या २५०४ मतपैकी २३४२ एवढी मते पडून निवडून आले.
दर पाच वर्षांनी ही निवडणूक होत असते. मागच्या कार्यकारी मंडळात ते निवडणूक आले होते. त्यांना म.सा.प. च्या संस्कृतिक विभागाचे प्रमुख म्हणून कार्यकारणीने निवड केली होती. दुसऱ्यांचा ते निवडून आले आहेत. प्रा. राम चव्हाण यांनी निवडणूक आधिकारी म्हणून काम पाहिले.
ठाले पाटील गटाचे सर्व २२ उमेदवार २३०० पेक्षा जास्त मतांनी निवडणून आले. त्यात कौतिकराव ठाले पाटील, डॉ. दादा गोरे, के. एस. अतकरे, किरण सगर, डॉ. दीपा क्षीरसागर, डॉ. ऋषिकेश कांबळे, आसाराम लोमटे, देविदास फुलारी, डॉ. संजीवनी तडेगावकर, दगडू लोमटे, हेमलता हिंगमिरे पाटील, सरोज देशपांडे, रामचंद्र काळुंखे, संजीव कुलकर्णी, रामचंद्र तिरुके, संतोष तांबे, नितीन तावडे, अनंत कराड, प्राचार्य नामदेव वाबळे, प्रा. गणेश मोहिते, जयद्रथ जाधव व सुभाष कोळकर हे निवडून आले. बीड जिल्ह्यातून डॉ. दीपा क्षीरसागर, दगडू लोमटे व अनंत कराड यांना यावेळी संधी मिळाली आहे.
विजयी उमेदवारांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!