*आ नमिता मुंदडा व अंजली घाडगे यांच्या या भेटीने केज मतदार संघात चर्चेला उधाण*
*आ नमिता मुंदडा व अंजली घाडगे यांच्या या भेटीने केज मतदार संघात चर्चेला उधाण*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
निवडणूकीची रणधुमाळी सुरु असतांनाच केज विधानसभा मतदारसंघाच्या भाजपा महायुतीच्या उमेदवार आ. नमिता मुंदडा यांनी आज
केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटा कडुन निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या प्रबळ दावेदार अंजली घाडगे यांची भेट घेऊन त्यांना आवर्जून वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. दरम्यान आ नमिता मुंदडा व अंजली घाडगे यांच्या या भेटीने केज मतदार संघात चर्चेला उधाण आले असून अंजली घाडगे नेमकं काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
केज विधानसभा मतदारसंघाच्या निवडणूकीच्या सुरुवातीच्या कालावधी मध्ये अंजली घाडगे यांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार पक्षाची आपल्याला उमेदवारी मिळावी यासाठी जोमाने प्रयत्न सुरू केले होते या साठी त्यांनी पक्षात जाहीर प्रवेशही केला होता.
खा बजरंग सोनवणे यांनी अंजली घाडगे यांना उमेदवारी मिळावी या साठी आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती
मात्र पक्षाने निष्ठावंत कार्यकर्ते म्हणून माजी आ. पृथ्वीराज साठे यांना उमेदवारीही दिली, उमेदवारी जाहीर न झाल्यामुळे त्या निवडणूक रिंगणातुन बाहेर पडल्या. याच पक्षातून उमेदवारी मागणाऱ्या प्रा. सौ. संगीता ठोंबरे यांनी अपक्ष म्हणून भरलेला उमेदवारी अर्ज मागे घेतला व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांना पाठिंबा दिला.
मात्र उमेदवारी दाखल केल्या पासून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांची प्रचार यंत्रणा हाताळणा-या लोकांनी अंजली घाडगे यांना काडी मात्र विचारले नाही. त्या मुळे त्या नाराज ही होत्या.
एकीकडे पृथ्वीराज साठे यांच्या साठी प्रा संगीता ठोंबरे, राजकिशोर मोदी यासह आणखी काही दिगग्ज मैदानात उतरलेले असताना प्रवाहाच्या बाहेर पडलेल्या अंजली घाडगे या आज अचानक दिसल्या आणि तेही भाजपाच्या अधिकृत उमेदवार आ. सौ. नमिता मुंदडा यांच्या सोबत. आ. सौ. नमिता मुंदडा यांनी आज अंजली घाडगे यांची वाढदिवसाच्या निमित्ताने भेट घेऊन शुभेच्छा दिल्या. या भेटीमध्ये आ. नमिता मुंदडा आणि अंजली घाडगे यांच्या मध्ये कोणत्या विषयावर चर्चा झाल्या याची माहिती मिळू शकली नाही.
दरम्यान आ नमिता मुंदडा व अंजली घाडगे यांच्या या भेटीने केज मतदार संघात चर्चेला उधाण आले असून अंजली घाडगे नेमकं काय निर्णय घेतात या कडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
