अंबाजोगाई

*पृथ्वीराज साठे यांच्या विजयासाठी राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने सर्वपक्षीय प्रचारफेरी स मतदारांचा प्रचंड प्रतिसाद*

 

अंबाजोगाई(प्रतिनिधी):- केज मतदार संघातील महाविकास आघाडीचे अधिकृत उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या विजयी प्रचारार्थ राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने अंबाजोगाई शहराच्या प्रभाग क्रमांक १,३,४, च्या भागात प्रचारफेरी काढण्यात आली होती. या प्रचारफेरीस संपूर्ण अंबाजोगाई शहरातील मतदारांनी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. प्रत्येक ठिकाणी या प्रचार फेरीतील नेत्यांचे स्वागत मोठ्या उत्साहात करतांना आढळून येत होता. शुक्रवार दि ९ रोजी निघालेल्या प्रचारफेरीत राष्ट्रवादी काँग्रेसचे राजकिशोर मोदी, डॉ नरेंद्र काळे, बबन लोमटे,महादेव आदमाने, शिवसेनेचे मदन परदेशी , आरपीआय चे ऍड दीपक कांबळे, समाजवादी पार्टीचे ऍड शिवाजी कांबळे, परदेशी त्याचबरोबर दिलीप काळे,पंडित हुलगुंडे, हाजी खालेक, दिनेश भराडीया, धम्मा सरवदे,बबन पानकोळी , सुभाष पानकोळी, चंद्रकांत महामुनी,अंकुश हेडे, मूनवर भाई, जावेद गवळी यांच्यासह अनेक कार्यकर्ते तसेच पृथ्वीराज साठे यांच्या पत्नी जयश्री साठे, कल्पना साठे, बालिका भोसले, चंद्रकला देशमुख, प्रेमलता लोदगे, सत्यशीला शिंदे, आशा जोगदंड, या सहभागी झाल्या होत्या.
महाविकास आघाडीचे केज विधानसभा मतदारसंघाचे उमेदवार पृथ्वीराज शिवाजीराव साठे यांच्या प्रचारार्थ आज अंबाजोगाई शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक, बलुतेचा मळा, कुत्तर विहीर, भट गल्ली, जैन गल्ली,कोठाड गल्ली, झारे गल्ली,धनगर गल्ली, बाराभाई गल्ली, दमगानपुरा, मनियार गल्ली, भोई गल्ली, बागवान गल्ली, सातपुते गल्ली, मंडी बाजार येथील परिसरात प्रचार फेरीचे आयोजन करण्यात आले होते.या प्रचारफेरीदरम्यान ५०० च्यावर कार्यकर्ते, महिला व पदाधिकारी सहभागी झाले होते.
या प्रचारफेरीत अंबाजोगाई शहर व केज विधानसभा मतदारसंघाच्या सर्वांगीण विकासासाठी येत्या २० नोव्हेंबर रोजी ‘तुतारी वाजवणारा माणूस’ या चिन्हासमोरील बटण दाबून पृथ्वीराज साठे यांना सेवा करण्याची संधी द्यावी अशी साद मतदारांना दिली. विद्यमान आमदार हे जनतेच्या मूलभूत मागण्यांकडे डोळेझाक करत असून ते केवळ ठराविक गुत्तेदारांना पोसण्याचे काम करीत आहेत . अशा सत्तापिपासू माणसांना सत्तेपासून दूर ठेवून एक जन् मानसाशी नाळ जोडला गेलेला माणूस पृथ्वीराज साठे याना येणाऱ्या २० तारखेला त्याच्या तुतारी वाजवणारा माणूस या चिन्हावर बटन दाबून भरघोस मतांनी निवडुन देण्याची विनंती राजकिशोर मोदी व प्रचारफेरीतील सर्व नेते हे करत होते.तुमचा आमचा सर्वांच्या हक्काचा असा उमेदवार म्हणजे पृथ्वीराज साठे हा असून तो निवडून आल्यानंतर केज मतदार संघातील सुशिक्षित बेरोजगार युवकांसाठी एमआयडीसी च्या माध्यमातून मोठा प्रकल्प उभारण्यासाठी प्राधान्य देऊन त्यांच्या रोजगाराचा प्रश्न सोडवण्यासाठीचे अभिवचन मतदारांना दिले . त्याचबरोबर महिलांसाठी कुटिरोद्योग, पिण्याच्या पाण्यासाठी सिंचन प्रकल्प, अंबाजोगाई जिल्हा निर्मितिचा प्रश्न प्राधान्याने सोडविण्यासाठी प्रयत्न शील राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात येते होते.
अंबाजोगाई शहराचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या पुढाकाराने पृथ्वीराज साठे यांच्या प्रचारार्थ काढलेल्या प्रचार रॅलीमध्ये सुनील वाघळकर, माणिक वडवणकर,भगवान ढगे, दत्ता सरवदे,हमीद चौधरी, सलीम चौधरी, सय्यद रशीद,जावेद गवळी, गोविंद पोतंगले, शाकेर काझी, अकबर पठाण, मुशीर बाबा, रमेश गायसमुद्रे, जमादार पठाण, आकाश कऱ्हाड, दत्ता हिरवे, महेबूब गवळी, रफिक गवळी,कैलास कांबळे, यश अलझेंडे, शंकर रणदिवे,ओम गवळे, साठे, गायकवाड , औचित्ते, कुरेशी, यांच्यासह शेकडो कार्यकर्ते सहभागी झाले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!