*प्रा.सोमनाथरावजी बडे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, संभाजीनगर बोर्डाच्या डायरेक्टर पदी निवड झाल्याबद्दल सत्कार संपन्न*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव
प्रा.सोमनाथरावजी बडे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, संभाजीनगर या बोर्डाच्या डायरेक्टर पदी निवड झाल्याबद्दल आज अंबाजोगाई येथे त्यांचा सत्कार करण्यात आला.
बीड जिल्ह्यातील वडवणी तालुक्यात असलेल्या चिंचवण येथील
मकरध्वज शिक्षण संस्थेचे सचिव व
प्रा.सोमनाथरावजी बडे यांची महाराष्ट्र राज्य परीक्षा मंडळ, संभाजीनगर या बोर्डाच्या डायरेक्टर पदी नुकतीच निवड झाल्या नंतर त्यांचे सर्वत्र अभिनंदन सुरू होते. अंबाजोगाई शहरात ते आले असता त्यांनी दीपावलीचे औचित्य साधून जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट दिली
यावेळी त्यांच्या समवेत इंद्रसिंग बडे ऋषिकेश बडे व जाधवर यांची उपस्थिती होती. या प्रसंगी सोमनाथ भाउ बडे यांचा यथोचित सत्कार करण्यात येऊन पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या प्रसंगी पत्रकार सलीम गवळी, शेख मुशीर बाबा, अलखेर पतसंस्थेचे मॅनेजर सय्यद रऊफ, क्लार्क शेख इमरान, विनोद जाधव, अमजद गवळी, जुम्मा गवळी यांची उपस्थिती होती.
