*स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाच्या पथकाने अंबाजोगाई शहरात टाकलेल्या धाडीत 2 लाख 21 हजार किंमतीचा गांजा जप्त*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने अंबाजोगाई शहरातील मंगळवार पेठ भागात गुप्त माहिती आधारे मिळालेल्या माहिती वरून धाडीत 2 लाख 21 हजार रुपये किंमतीचा गांजा जप्त केला असून 2 आरोपी विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की
अंबाजोगाई शहरातील मंगळवारपेठ
परिसरात राहणारे बाबाखों अकबरखॉ पठाण यांच्या घरात चोरून बेकायदेशीर रित्या गांजाची विक्री होत असल्याची गुप्त माहिती बीड येथील स्थानिक गुन्हे अन्वेषण विभागाला मिळाल्या वरून या पथकाने आज दि 07/11/2024 रोजी दुपारी 13.10 वाचे सुमारास बाबाखा च्या घरावर धाड टाकली असता या पथकाला घटनास्थळी विना परवाना बेकायदेशिर रित्या ओलसर, वाळसर, उग्रट, वास येत असलेला पान, बिया, फुल असलेला गांज्या एकुण 13.250 किलो ग्रॅम वजनाचा ताब्यात मिळुन आला असून या गांज्याची किमत 1,90,575 रुपये व इतर साहीत्य किमत 31,000 हजार रुपये असा ऐकुण 2,21,575/- चा ऐवज हस्तगत करण्यात आला म्हणुन
बाबाखों अकबरखॉ पठाण वय 49 वर्षे रा. मंगळवार पेठ, अंबाजोगाई व भास्कर भोजाना मेकला वय 50 वर्षे रा. मुक्काम कुपरी, पोस्ट नेरडीगुड्डा, तहसील नेरडीगुड्डा जि. अदीलाबाद राज्य तेलंगना या आरोपी विरुद्ध
सिध्देश्वर शिवराम मुरकूटे वय 34 वर्षे व्यावसाय नौकरी पोलीस उप निरीक्षक नेमणुक स्थानिक गुन्हे शाखा बीड यांच्या फिर्यादी वरून गुरनं 481/2024 कलम कलम 8 (क), 20 NDPS प्रमाणे गुन्हा दाखल करुन पुढील तपास
बीड जिल्हा पोलीस अधीक्षक अविनाश बारगळ यांच्या मार्गदर्शनाखाली पो नि. विनोद घोळवे हे करत आहेत.
