*_मायबाप जनतेचा आशिर्वाद मला मिळणार – आमदार नमिताताईंना विश्वास_*
*केज मतदारसंघातील विकासप्रिय जनता बनली नमिता मुंदडांची स्टार प्रचारक*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
माझा स्टार प्रचारक हा केज विधानसभा मतदार संघातील विकासप्रिय जनता आणि मतदार राजा आहे. त्यांनीच ही निवडणुक हातात घेतली आहे. मायबाप जनतेचा आशिर्वाद मला मिळणार आहे. यात तिळमात्र शंका नाही असा विश्वास भाजपा महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.सौ.नमिता अक्षय मुंदडा यांनी व्यक्त केला. गुरूवार, दिनांक ७ नोव्हेंबर रोजी केज मतदारसंघात विविध ठिकाणी आयोजित कॉर्नर बैठकांतून मतदारांशी संवाद साधताना त्या बोलत होत्या.
भाजपा व महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.नमिता मुंदडा या केज मतदारसंघामध्ये जनतेशी सातत्यपूर्ण संवाद साधत आहेत. मतदारसंघातील विविध ठिकाणच्या कॉर्नर बैठकांमध्ये मतदारांना आवाहन करताना त्या म्हणाल्या की, मागील पाच वर्षांत आम्ही महायुती सरकारच्या माध्यमातून विकास कामांसाठी भरीव निधी आणला. आमच्या लोकप्रिय नेत्या आ.पंकजाताई मुंडे व माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली तसेच काकाजी व अक्षयजी यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही काम करीत आहोत. पाच वर्षांत विकासाचे अनेक प्रश्न मार्गी लावण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला. जे काम राहिले असेल ते पुढील काळात सोडविण्यासाठी आमचा प्रयत्न राहील. तुमच्या हक्काच्या या तुमच्या कुटुंबातील मुलीला, बहिणीला पुन्हा एकदा मतदानरूपी आशिर्वाद देवून मला विजयी करा. तुमच्या एका-एका मतांची किंमत मी विकासाच्या माध्यमातून चुकती केल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, मी दिलेला शब्द पाळणारी एक महिला लोकप्रतिनिधी आहे, नुसत्या गप्पा मारणारी नाही. असा ठाम विश्वास व्यक्त करून मतदारांच्या मनात मोठा विश्वास आ.नमिता मुंदडा यांनी निर्माण केला आहे. दरम्यान केज विधानसभा मतदार संघात आ.मुंदडा यांच्या कॉर्नर बैठकांना सभेचे स्वरूप प्राप्त होत आहे. केज विधानसभा मतदारसंघातील विविध गांवचे सरपंच, उपसरपंच, सेवा सहकारी सोसायटीचे चेअरमन, ग्रामपंचायत सदस्य तसेच विविध संस्थांचे पदाधिकारी आणि तरूण युवक मतदारांनी आमदार नमिताताई यांनाच पुन्हा विजयी करण्याचा निर्धार बोलून दाखवला आहे. विविध गावांमध्ये आ.मुंदडा यांना उत्स्फुर्त प्रतिसाद मिळत आहे, त्यांचा विजयरथ आता कोणीही रोखू शकत नाही अशी चर्चा केज विधानसभा मतदारसंघात सर्वत्र होताना दिसत आहे.
=======================
=======================
