अंबाजोगाई

*अखेर ठरलं राजकिशोर पापा मोदी सह अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते तुतारी हाती घेऊन उद्या पासून खुले आम मैदानात*

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
     अखेर माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी सह अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते तुतारी हाती घेऊन खुले आम उद्या पासून मैदानात उतरणार असून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे केज मतदार संघाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या जागी मीच आमदारकीचा उमेदवार आहे असे समजून सर्वांनी कामाला लागावे असे आव्हान मोदी यांनी आयोजित केलेल्या
भव्य अशा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात केले.
     केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून संकट समयी साथ दिल्या मुळे निष्ठेचे फळ म्हणून पक्षाने माजी आ पृथ्वीराज साठे यांना केज मतदार संघाची उमेदवारी दिली. साठे यांच्या समोर विद्यमान आमदार सौ नमिता मुंदडा यांचे कडवे आव्हान व मुंदडा यांची प्रचार यंत्रणा अतिशय शिस्तबद्ध रित्या राबवली जात असताना केज मतदार संघात एकाकी पडलेल्या पृथ्वीराज साठे यांना निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी आ संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाठिंबा दिल्या मुळे केज मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे
उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांना बळकटी मिळाली.
     साठे यांच्या साठी जमेची बाजू  निर्माण झाली असताना त्यांच्या मदतीला आता महायुतीच्या घटक पक्षात असलेले अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी हे धावले असून मोदी यांनी आज येथील मुकुंदराज सांस्कृतिक सभागृहात कार्यकर्त्या सोबत संवाद साधण्यासाठी बैठकीचे आयोजन केले होते. मोदी यांनी हाक देताच शहराच्या विविध भागातून कार्यकर्त्यांचे लोंढेच्या लोंढे सभागृहात येऊ लागले. या बैठकीस अंबासाखरचे व्हाईस चेअरमन दत्तात्रय आबा पाटील, बबन भेय्या लोमटे, चंद्रशेखर वडमारे, डॉ राजेश इंगोले, मनोज लखेरा, खालेद चौस, महादेव आदमाने, सुनील वाघाळकर या प्रमुख कार्यकर्त्या सह हजारो कार्यकर्त्यांची उपस्थिती होती
     या वेळी बोलताना राजकिशोर मोदी यांनी शहरात काम करत असताना आपली कशी घुसमट होते आहे, मागील 5 वर्षात आपल्या विरोधात कशी कुटील कारस्थाने केली जात आहेत या बाबत खंत व्यक्त करत विधानसभा निवडणुकीत केज मतदार संघाचे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे उमेदवार पृथ्वीराज साठे यांच्या पाठीशी पूर्ण ताकती निशी आपण मैदानात उतरत असून पृथ्वीराज साठे यांच्या जागी मीच आमदारकीचा उमेदवार आहे असे समजून सर्व कार्यकर्त्यांनी कामाला लागावे असे आव्हान केले.
      या मेळाव्यात ठरल्या प्रमाणे उद्या
7 नोव्हेंबर पासून पापा मोदी व अजित पवार गटाचे सर्व कार्यकर्ते राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात जाहीर प्रवेश न करता हाती तुतारी घेऊन खुले आम मैदानात उतरणार आसल्याने एकाकी पडलेल्या पृथ्वीराज साठे यांची ताकत चांगलीच वाढली असून कार्यकर्त्या मध्ये उत्साह संचारला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!