*माजी आ पृथ्वीराज साठे यांच्या चेहऱ्यावर आले तेज, आता निवडणुकीला खरी रंगत येणार* *प्रा संगीता ठोंबरे पाठोपाठ राजकिशोर पापा मोदी यांची तुतारी हाती घेऊन खुले आम मैदानात उतरण्या साठी कार्यकर्त्या सोबत बैठक*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदार संघात अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढण्यास इच्छुक असलेल्या प्रा संगीता ठोंबरे यांनी आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन पृथ्वीराज साठे यांना जाहीर पाठिंबा दिल्याने आणि 7 नोव्हेंबर पासून अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी हे तुतारी हाती घेऊन खुले आम मैदानात उतरणार असल्याने एकाकी पडलेल्या पृथ्वीराज साठे यांच्या चेहऱ्यावर तेज आले असून आता निवडणुकीला खरी रंगत येणार आहे.
केज मतदार संघातून राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाकडून संकट समयी साथ दिल्या मुळे निष्ठेचे फळ म्हणून पक्षाने माजी आ पृथ्वीराज साठे यांना केज मतदार संघाची उमेदवारी दिली. साठे यांच्या समोर विद्यमान आमदार सौ नमिता मुंदडा यांचे कडवे आव्हान व मुंदडा यांची प्रचार यंत्रणा अतिशय शिस्तबद्ध रित्या राबवली जात असताना केज मतदार संघात एकाकी पडलेल्या पृथ्वीराज साठे यांना निवडणूक रिंगणात उतरलेल्या माजी आ संगीता ठोंबरे यांनी आपली अपक्ष उमेदवारी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे प्रदेशाध्यक्ष मा जयंत पाटील, खा सुप्रियाताई सुळे व बीडचे खा बजरंग सोनवणे यांच्या शिष्टाईने
आपला उमेदवारी अर्ज मागे घेऊन पाठिंबा दिल्या मुळे केज मतदार संघात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाचे
उमेदवार माजी आ पृथ्वीराज साठे यांना बळकटी मिळाली.
साठे यांच्या साठी ही गोष्ट दुधात साखर पडली असताना त्यांच्या मदतीला आता महायुतीच्या घटक पक्षात असलेले अजित पवार गटाचे माजी नगराध्यक्ष राजकिशोर पापा मोदी हे धावल्याने व 7 नोव्हेंबर पासून पापा मोदी हे हाती तुतारी घेऊन खुले आम मैदानात उतरणार आसल्याने आणि याच पार्श्वभूमीवर राजकिशोर पापा मोदी हे उद्या सायंकाळी 6 वाजता कार्यकर्त्या सोबत संवाद बैठक घेत आहेत. एकूणच घडत असलेल्या या घडामोडी पाहता आता एकाकी पडलेल्या पृथ्वीराज साठे यांच्या साठी उजवा कौल असल्याने साठे चेहऱ्यावर तेज आले असून आता निवडणुकीला खरी रंगत येणार आहे.
