अंबाजोगाई

*स्वर्गीय विमलताई ते नमिताताई केज विधानसभा मतदारसंघात विकासाचा सुवर्णकाळ*

 

*केज मतदारसंघाच्या अखंडीत विकासासाठी जनतेने आम्हाला पुन्हा संधी द्यावी – आमदार नमिताताई मुंदडा*
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
बीड जिल्ह्यात स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्या 35 वर्षांच्या यशस्वी कारकिर्दीनंतर मध्यंतरी मागे पडलेला केजचा विकास हा 2019 च्या निवडणूकीत आ.नमिताताई मुंदडा यांच्या रूपात पुन्हा परत आला. त्यामुळे विकासनिधी कसा खेचून आणायचा हा फक्त मुंदडा कुटूंबांचा हातखंडा असल्याचे वारंवार सिद्ध झाले आहे.

मंगळवार, दिनांक 5 नोव्हेंबर रोजी केज मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने आ.नमिताताई यांनी दीपेवडगाव, पळसखेडा, बोरीसावरगाव, कानडी बदन, कौडगाव या गावांना भेट दिली व सर्वांशी संवाद साधला. या प्रसंगी भारतीय जनता पक्ष आणि महायुतीचे सन्माननीय नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वर्गीय विमलताई मुंदडा यांच्यानंतर गेल्या अडीच वर्षांत महायुतीचे सरकार आल्यापासून आमदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रीतमताई मुंडे यांच्या नेतृत्वाखाली व ज्येष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा आणि युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या मार्गदर्शनाखाली आमदार नमिताताई यांनी भरघोस निधी आणून मतदारसंघातील प्रत्येक वाडी, वस्ती, तांडा यापासून शहरापर्यंत रस्ते, विज, पाणी घेऊन जाण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला व त्या यशस्वी सुद्धा झाल्या. त्यामुळेच या निवडणुकीत विधानसभेत आमदार नमिताताई मुंदडा यांच्याशिवाय पर्याय दिसत नसल्याचे लोकांचे मत झाले आहे‌. म्हणूनच केज मतदारसंघातील वाड्या, वस्त्यापासून शहरापर्यंत सर्व जनता म्हणतेय म्हणतेय कहो दिल से… नमिताताई फिरसे.

=======================
=======================

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!