केज मतदारसंघात फक्त आ.नमिता मुंदडांचाच बोलबाला..!* *_आ.मुंदडा यांनी प्रचारात घेतली जोरदार आघाडी_
=======================
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
केज मतदारसंघात जस – जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे. तस – तशी भाजपा महायुतीच्या उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे. सध्या केज मतदारसंघात फक्त आ.नमिता मुंदडांचाच बोलबाला दिसून येत आहे.
सोमवार, दिनांक ४ नोव्हेंबर रोजी आ.मुंदडा यांनी केज मतदारसंघातील प्रचार दौऱ्याच्या निमित्ताने केज तालुक्यातील बनसारोळा, इस्थळ, सौंदना, औरंगपूर, आवसगांव या गावांना भेट दिली. तसेच या प्रचारफेरी दरम्यान आगामी विधानसभा निवडणुकीत मला मतदानरूपी आशीर्वाद द्यावेत, अशी मतदार बंधू-भगिनींना विनंती केली. लोकांशी असलेला सातत्यपूर्ण जनसंपर्क, संवाद आणि विकास कामांसाठी आणलेल्या भरघोस निधीमुळे, झालेल्या अनेक विकास कामांमुळे आणि महिलांसाठी राबविलेल्या लाडकी बहिण योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे व वयोवृद्धांसाठी तिर्थक्षेत्र योजनेच्या प्रभावी अंमलबजावणीमुळे भाजप महायुतीच्या उमेदवार आमदार नमिता मुंदडा या जनतेच्या मनात आपुलकी, आपलेपणा निर्माण करण्यात यशस्वी झाल्या आहेत. तसेच त्यांचा सोज्वळ स्वभाव व जनतेचे म्हणणे ऐकून घेऊन त्यावर तात्काळ तोडगा काढून सांगितलेले काम मार्गी लावण्याच्या तत्परतेमुळे आ.नमिता मुंदडा यांनी मतदानाआधीच इतर उमेदवारांना केज मतदारसंघातून खुप मागे टाकले आहे. समाजसेवक तसेच भाजपचे जेष्ठ नेते नंदकिशोर मुंदडा (काकाजी) यांच्या मार्गदर्शनाखाली व युवा नेते अक्षय मुंदडा यांच्या नेतृत्वाखाली भाजप महायुतीचे नेते, कार्यकर्ते देखील मोठ्या प्रमाणात त्यांच्या प्रचारासाठी कामाला लागले आहेत. आमदार पंकजाताई मुंडे, माजी खासदार डॉ.प्रितमताई मुंडे यांची भक्कम साथ यामुळे महायुतीच्या अधिकृत उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांचाच केज मतदारसंघात बोलबाला निर्माण झाला असून त्यांचा विजय जवळपास निश्चित झाला आहे. अशी चर्चा मतदारसंघात सर्वत्र ऐकायला मिळत आहे. केज मतदारसंघात जस – जशी निवडणूक मतदानाची तारीख जवळ येत आहे. तस – तशी भाजपा महायुतीच्या उमेदवार आ.नमिता अक्षय मुंदडा यांनी प्रचारात जोरदार आघाडी घेतली आहे.
=======================
*
=======================
