*डॉ.नवनाथ घुगे यांना आय.एम.ए चा राज्यस्तरीय पुरस्कार जाहिर, 8 नोव्हेंबर रोजी पुणे येथे वितरण*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
अंबाजोगाई शहरातील प्रसिद्ध असे ह्दयरोगतज्ञ डॉ.नवनाथ घुगे यांना यंदाचा आय.एम.ए च्या वतीने दिला जाणार राज्यस्तरीय आय.एम.ए. एम.एस.प्रेसिंडेट अॅप्रेसिएशन अॅवॉर्ड जाहिर करण्यात आला आहे. याचे वितरण येत्या 08 नोव्हेबर रोजी ठाणे मुंबई येथे मान्यवरांच्या उपस्थितीत केले जाणार आहे. डॉ.नवनाथ घुगे यांना जाहिर झालेल्या पुरस्काराबद्दल सर्वस्तंरातून अभिनंदन केले जात आहे.
डॉ.नवनाथ घुगे हे गेल्या 20 वर्षापासून अंबाजोगाई शहरात ह्दयरोगतज्ञ म्हणून कार्यरत आहेत. त्यापूर्वी त्यांनी मुंबई येथील नामांकित असलेल्या केईएम हॉस्पिटल असो किंवा त्या ठिकाणचे लिलावती हॉस्पिटल असो त्या ठिकाणी उत्कृष्ट व उत्तम सेवा दिलेली आहे. त्यादरम्यान त्यांच्या हातून देशाचे तत्कालीन पतप्रधान अटलबिहारी वाजपेयी, सिनेअभिनेते महानायक अमिताभ बच्चन यांच्यावर उपचार करण्याची संधी त्यांना प्राप्त झालेली आहे. चांगल्या ठिकाणी चांगली सेवा करत असताना त्यांनी आपल्या ग्रामीण भागातील माणसांची सेवा करता यावी या साठी महानगर सोडून थेट अंबाजोगाई गाठले आणि या ठिकाणी 20 वर्षापासून अविरत सेवा सुरु आहे. गेल्या 20 वर्षामध्ये असंख्य रुग्णांना मृत्युच्या दाढेतून बाहेर काढलेले आहे. अनेक रुग्णांना त्यांच्यामुळे नवसंजीवनी मिळालेली आहे. शहरातील सामाजिक कार्यामध्ये त्यांचे मोठे योगदान आहे. शिक्षण महर्षी नारायणदादा काळदाते स्मृती समारोह, आधार माणुसकीचा व इतर उपक्रमात त्यांचा पुढाकार असतो. शिवाय आयएमए अंबाजोगाईचे अध्यक्ष म्हणून ते कार्यरत आहेत. रोटरीचे पदाधिकारी म्हणून काम करतात.एक संवेदनशील व्यक्तीमत्व म्हणून त्यांचा लौकिक आहे. अशा या व्यक्तीमत्वाला अनेक पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आलेले आहे.आयएमए ही राष्ट्रीय स्तरावर डॉक्टरासाठी काम करणारी संस्था आहे.आय एम ए च्या कामाच्या बाबतीत व्यापकता निर्माण करून वर्षभरात वेगवेगळे उपक्रम राबवले या कामाची दखल घेवून त्यांना आय एम ए संस्थेच्या वतीने डॉ.घुगे यांना 2023-24 चा राज्यस्तरीय आयएमए एम.एस.प्रेसिडेंट अॅप्रेसिएशन अॅवॉर्ड जाहिर करण्यात आला आहे. या पुरस्काराचे वितरण येत्या 8 नोव्हेबर रोजी मुंबई ठाणे येथे सायंकाळी 7 वाजता सुप्रिम बँकट, डॉ.काशिनाथ घाणेकर सभागृह,ठाणे मुंबई येथे वितरीत केला जाणार आहे. त्यांना मिळालेल्या पुरस्काराबद्दल डॉ. नवनाथ घुगे यांचे स्वा रा ती चे अधिष्ठाता डॉ शंकर धपाटे, आय एम ए चे सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ राजेश इंगोले, डॉ नवनाथ रेड्डी, डॉ सचिन काळे, डॉ सचिन पोतदार, डॉ नितीन पोतदार, डॉ गोपाळ पाटील, डॉ राहुल धाकडे, डॉ अतुल शिंदे, डॉ विजय फड, डॉ सुधीर धर्मयात्रे, डॉ गुणाल, डॉ पाचेंगावकर, डॉ लामतुरे, डॉ बरदापुरकर, डॉ भुसारे, डॉ अतुल देशपांडे, डॉ तोष्णीवाल, यांच्या सह अनेकांनी अभिनंदन केले आहे.
