अंबाजोगाई

स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने मनोज जरांगे यांच्या भूमिकेवर लक्ष ठेऊन असलेले सर्व उमेदवार संभ्रम अवस्थेत 

अंबाजोगाई (प्रतिनिधी)
      मराठा संघर्ष योद्धे मनोज जरांगे यांनी आज ही (एम डी एम) फार्मूल्या नुसार कोणत्या उमेदवारांना पाठिंबा द्यायचा या बाबत स्पष्ट भूमिका जाहीर न केल्याने जरांगे यांच्या भूमिकेवर लक्ष ठेऊन असलेले सर्वच मतदार संघातील उमेदवार हे उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा उद्या शेवटचा दिवस असल्याने संभ्रम अवस्थेत सापडले आहेत.
      मागील एक वर्षा पासून मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळावे या साठी मनोज जरांगे यांच्या नेतृत्वाखाली राज्य भरात सुरू असलेले आंदोलन, या आंदोलनातुन एकवटलेला मराठा समाज आणि 4 महिन्या पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकीत जरांगे फॅक्टरने दाखवलेला चमत्कार यामुळे राज्यात महाविकास आघाडी कडे मतदारांचेच नव्हे तर विधान सभा निवडणूक लढवणाऱ्या इच्छुकांचे आकर्षण मोठ्या प्रमाणावर वाढले. नुकत्याच राज्यभर वाहू लागलेल्या विधानसभेच्या वाऱ्यात मराठा समाजाची भूमिका ही निर्णयायक ठरणार हे सत्य कोणीही नाकारू शकत नाही. लोकसभेला ज्या प्रमाणे जनतेने नेत्यांच्या शब्दाला काडीचीही किंमत न देता आपण काय करू शकतो हे दाखवून दिले. तीच परिस्थिती आजही विधान सभेच्या पार्श्वभूमीवर सर्व राज्यभरात दिसून येत आहे. विधानसभा निवडणूकीतील उमेदवारी अर्ज दाखल झाले असून या मध्ये मनोज जरांगे यांच्या आदेशानुसार बहुतांश मतदार संघात आमदारकी साठी इच्छुकानी अपक्ष उमेदवाऱ्या दाखल केल्या. त्या नंतर अंतरवली सराटी मध्ये  जरांगे यांच्या सोबत दलित व मुस्लिम नेत्यांच्या बैठका झाल्या आणि यातून मराठा, दलित व मुस्लिम मतांचे एकत्रीकरण करण्यासाठी एम डी एम फॅक्टर उदयास आला. या बैठकीत ठरल्या प्रमाणे मनोज जरांगे 4 नोव्हेंबर ही उमेदवारी अर्ज मागे घेण्याची शेवटची तारीख असल्याने आज 3 नोव्हेंम्बर रोजी कोणत्या मतदार संघात कोणत्या उमेदवाराला पाठिंबा द्यायचा, कोणत्या उमेदवाराला पाडायचे या बाबत एम डी एम फॅक्टर ला सूचित करणार होते. त्यामुळे जवळपास सर्वच मतदार संघातील महायुती वगळता अन्य सर्व उमेदवार जरांगे यांच्या सोबत बैठका घेऊन आदेशा कडे कान लावून होते.
    ठरल्या प्रमाणे अंतरवली सराटी मंध्ये उमेदवारी साठी गुडघ्याला बाशिंग बांधून असलेल्या कार्यकर्त्या सह हजारोच्या उपस्थिती मध्ये जरांगे पाटील यांनी उपस्थिता सोबत संवाद साधला, आपले उमेदवार द्यायचे म्हणून मोजक्या मतदार संघाच्या नावाची घोषणा केली. मात्र करण्यात आलेली घोषणा आणि उमेदवारांच्या नावाचा स्पष्ट उल्लेख न झाल्याने अनेकांचा भ्रम निरास झाल्याची चर्चा असून आज पर्यंत तरी मराठा समाज मोठ्या संख्येने मनोज जरांगे यांच्या पाठीशी खंबीरपणे उभा असला तरी उद्या उमेदवारी अर्ज मागे घेण्याचा शेवटचा दिवस असल्याने सर्व जण संभ्रम अवस्थेत आसून लवकरात लवकर जरांगे पाटील यांनी भूमिका स्पष्ट न केल्यास चित्र वेगळे दिसू शकते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!