*महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी महायुती सरकारला मतदान रुपी आशीर्वाद देणार की पुढच्या हप्त्याच्या ओवाळणीची वाट पहात महायुती सरकारची वाट लावणार*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा ना अजित पवार भाऊंना मतदान रुपी आशीर्वाद देणार की भाऊंनी जाहीर केलेल्या लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याच्या ओवाळणीची वाट पहात महायुती सरकारची वाट लावणार याच उत्तर 23 नोव्हेम्बर रोजी मिळणार आहे.
अडीच वर्षा पूर्वी महाराष्ट्रात महाविकास आघाडी सरकार मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला आणि दीड वर्षा पूर्वी राष्ट्रवादी काँग्रेसला फोडून सत्तेवर आलेल्या महायुती सरकारची प्रतिमा मलिन झाल्याने आणि काही केल्या ती सुधारत नाही हे लक्षात आल्याने व येणाऱ्या निवडणुकीचे सर्वच सर्व्हे महा युतीला धक्का देणारे येऊ लागल्याने महायुती सरकारने मतदारांना आकर्षित करण्यासाठी विविध योजनांची खैरात सुरू केली. या मध्ये सर्वात चर्चेला आलेली योजना म्हणजे “मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना”.
या मुख्यमंत्री लाडकी बहीण योजने मध्ये सरकारने वय वर्ष 21 ते 65 वयोगटातील महिलांच्या बँक खात्यावर दरमहा दीड हजार रुपये जमा होतील अशी घोषणा केली व या घोषणे नुसार निवडणुका तोंडा समोर ठेऊन सरकारने प्रत्येक लाडक्या बहिणीच्या बँक खात्यावर आता पर्यंत पाच महिन्यांचे साडे सात हजार रुपये पाठवलेही.
बँक खात्यावर साडेसात हजार आल्याने राज्यातील लाडक्या बहिणी जाम खुश झाल्या खऱ्या. मात्र दुसरीकडे आपल्याला दरमहा दिलेले दीड हजार रुपये सरकार दैनंदिन जीवनावश्यक वस्तूंचे भाव वाढवुन दाजीच्या खिशा मधून काढून घेते आहे ही बाब ही आता फोडणी महागल्याने बहिणीच्या नजरे मधून चुकलेली नाही.
त्यामुळे हुशार झालेल्या महाराष्ट्रातील लाडक्या बहिणी 20 नोव्हेंबर रोजी होऊ घातलेल्या विधानसभा निवडणुकी मध्ये मुख्यमंत्री मा ना एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री मा ना देवेंद्र फडणवीस व उपमुख्यमंत्री मा ना अजित पवार भाऊंना मतदान रुपी आशीर्वाद देणार की भाऊंनी जाहीर केलेल्या लाडक्या बहिणीच्या पुढच्या हप्त्याच्या ओवाळणीची वाट पहात महायुती सरकारची वाट लावणार याच उत्तर 23 नोव्हेम्बर रोजी मिळणार आहे हे मात्र निश्चित.
