*दीपावलीच्या पूर्व संध्येस डोक्यात दगड घालून सचिन तिडके या जावायाचा खून, घटना ऊसतोड मजूर प्रकरणा मधून झाल्याचा संशय*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
दीपावलीच्या पूर्व संध्येस डोक्यात दगड घालून सचिन तिडके या जावायाचा खून केल्याची घटना अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा या ठिकाणी घडली असून सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे.
या विषयी प्राप्त माहिती अशी की, वडवणी तालुक्यातील भोगलवाडी येथील रहिवासी हा मागील अनेक वर्षा पासून अंबाजोगाई तालुक्यातील डोंगर पिंपळा येथे सहकुटुंब वास्तव्यास असलेला सचिन शिवाजी तिडके वय 35 हा पत्नी आणि मुलांसोबत राहत होता. तो डोंगर पिंपळा या गावचा जावई असल्या कारणाने तो गावात वास्तव्यास होता व ऊसतोड मुकदमाचे काम करत होता. मजूर मिळवण्या साठी त्याने यमराज राठोड या यवतमाळ येथील एजंट ला डोंगर पिंपळा येथे आणून ठेवले होते. सोमवारी दुपारी एका मजुराला मारहाण केल्याच्या कारणा हुन यमराज व मयत तिडके यांच्यात बाचाबाची झाली. त्या नंतर यमराज अंबाजोगाई मध्ये गेला व परत काही मजूर घेऊन डोंगर पिंपळा येथे परत आला. त्या नंतर रात्रीतून त्यांच्या मध्ये काही तरी आणखी वाद झाला व त्या नंतर यमराज सह सोबत आणलेले माणसे ही फरार झाले.
आज दुपारी 1 वाजता तिडके याचा मृतदेह डोंगर पिंपळा शिवारात आढळून आल्या नंतर घटनेची माहिती मिळताच अंबाजोगाई ग्रामीण पोलीस घटनास्थळी दाखल झाले आसून मृतदेहाची पाहणी केली असता मयताला दगडाने ठेचून मारल्याचे समोर आले आहे.
मयत सचिन यच्या पश्चात दोन मुलं, पत्नी, आई, वडील, भाऊ, भावजय असा परिवार आहे. ऐन दिवाळीचा आनंदाचा सण साजरा होत असताना तिडके कुटुंबीयावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करित आहेत
