*राज्याचे कृषिमंत्री ना. धनंजय मुंडे यांनी मोदी कुटुंबाचे त्यांच्या निवासस्थानी भेटून केले सांत्वन*
अंबाजोगाई (प्रतिनिधी):- राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश उपाध्यक्ष तथा माजी नगराध्यक्ष राजकिशोर मोदी यांच्या काकी तथा सुरेश मोदी यांच्या मातोश्री स्व सावित्रीबाई प्रकाश मोदी यांचे शनिवार दि 26 रोजी वृद्धापकाळाने निधन झाले होते. त्याचा अंत्यविधी मंगळवार दि 29 रोजी सकाळी 10 वाजता संपन्न झाला. यावेळी बीड जिल्ह्यातील विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर तथा मोदी कुटुंबावर प्रेम करणारे अनेकजण उपस्थित होते. अंत्यसंस्कारास उपस्थित न राहता आल्याने दुपारी राज्याचे कृषिमंत्री ना धनंजय मुंडे यांनी मोदी कुटुंबाची त्यांच्या निवासस्थानी सांत्वनपर भेट घेतली. भेटीदरम्यान धनंजय मुंडे यांनी स्व सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेस पुष्पहार व पुष्पांजली अर्पण केला. यावेळी मोदी परिवारास धीर देऊन त्यांच्या दुःखात ते सहभागी असल्याचे सांगितले. त्याचबरोबर ईश्वर मोदी कुटुंबास निसर्गाने दिलेले दुःख पेलविण्याची शक्ती व बळ देवो अशी प्रार्थना केली.
या भेटीदरम्यान ना.धनंजय मुंडे यांच्या सोबत राष्ट्रवादी काँग्रेसचे बीड जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण, हे होते. यावेळी निवासस्थानी स्वा रा ती चे मेडिसिन विभाग प्रमुख डॉ सिद्धेश्वर बिराजदार , राजकिशोर मोदी, भूषण मोदी, सुरेश मोदी व संकेत मोदी हे उपस्थित होते.
