अंबाजोगाई

*धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज झालेल्या माजी आ संजय दौंड यांची मुंडे यांच्या सोबत दिलजमाई*

 *आमच्या मध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा मा धनंजय मुंडे व संजय दौंड यांचा संयुक्त पत्रकार परिषदेत खुलासा*
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
   विधान सभेच्या तोंडावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटाच्या उंबरट्यावर जाऊन पालकमंत्री
धनंजय मुंडे यांच्या विरुद्ध निवडणूक रिंगणात उतरण्यास सज्ज होऊन
माजी आ संजय दौंड यांनी तीन दिवसा पूर्वीच कार्यकर्त्यांची संवाद बैठक घेऊन धंनजय मुंडे यांच्या विरुद्ध आरोप केले होते. मात्र पवार गटाची उमेदवारी न मिळाल्याने पुन्हा धनंजय मुंडे यांच्या सोबत त्यांची सलगी झाली असून आमच्या मध्ये कुठलेही मतभेद नसल्याचा खुलासा मा धनंजय मुंडे व संजय दौंड यांनी संयुक्त पत्रकार परिषदेत केला.
   या प्रसंगी माजी आमदार संजय दौंड, जेष्ठ नेते दत्ता आबा पाटील, बीड जिल्हाध्यक्ष राजेश्वर चव्हाण, विधानसभा अध्यक्ष गोविंद देशमुख, तालुका अध्यक्ष राजाभाऊ औताडे, रणजित लोमटे, शिवाजी सिरसाट, बाळू सोनवणे यांच्या सह असंख्य कार्यकर्ते उपस्थित होते.
    या वेळी बोलताना मा धनंजय मुंडे म्हणाले की, माजी आमदार संजय दौंड व माझ्यात मतभेद असल्याच्या वेगवेगळ्या अफवा मागील काही दिवसात पसरल्या जात आहेत, मी आणि त्यांनी परळी मतदार संघात आयुष्य झिजवल. 2019 च्या निवडणुकीत जनतेचे आशीर्वाद मला मिळाले. दौंड यांच्या सोबतच माझं नात राजकारणा पलीकडे आहे. कार्यकर्त्यात समज गैरसमज झाल्याने काम करण्यात अडचणी येत होत्या. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी संवाद मेळावा घेतला होता. त्यानंतर काल त्यांच्या सोबत चर्चा झाली. आता माझ्या निवडणुकीत आणि विजया साठी त्यांच्या सह सर्व जण ताकती निशी प्रचारात उतरणार आहेत.
    मी निवडणुकीची लढाई सोपी समजत नाही सुरवात चांगली झाली की विजय सुकर होतो. आजची सुरवात चांगली झाल्याने आता विजय सुकर होणार आहे. लोकशाही मध्ये जातीचा नव्हे तर कुठलाही फॅक्टर नसतो.
    परळीत बोटावर मोजण्या ऐवढे बूथ संवेदनशील असताना 122 संवेदनशील बुथ असा आरोप म्हणजे मतदार जनतेवरचा हा गैरविश्वास आहे. परळी मतदार संघ बदनाम करण्याचा प्रकार असून त्या मातीत राहणाऱ्या लोकांचा हा अवमान आहे. कुठल्याही मुद्यावर निवडणूक लढवा मात्र या मातीला बदनाम करण्याच राजकारण विरोधकांनी करू नये.
   महाराष्ट्रात जे जातीय राजकारण सुरू आहे ते पुरोगामी महाराष्ट्राला शोभणारे नाही. माझ्या दृष्टीने निवडणुकी पेक्षाही सामाजिक सलोखा महत्वाचा असून तो अबाधित राहण्या साठी निवडणूक हे माध्यम आहे
   महाविकास आघाडीने कोण उमेदवार द्यावा हा त्यांचा प्रश्न असून मी कधीही जात पात पाहून राजकारण करत नाही, समोरचा कोण राजकारण करत असेल तर परमेश्वर त्याला सदबुद्धि देवो.
   या वेळी बोलताना माजी आमदार संजय दौंड म्हणाले की मागील काळात आम्ही भावा भावा प्रमाणे काम केलं. कार्यकर्त्यांच्या भावना जाणून घेण्यासाठी मी संवाद मेळावा घेतला या मेळाव्यात मी मुंडे साहेबांवर कुठलेही आरोप केले नाहीत. राज्याचे नेतृत्व करण्यासाठी जबाबदारी त्यांच्यावर आसल्याने आमची सर्व टीम मतदार संघात काम करणार आहे. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्रजी पवार गटातील पक्ष प्रवेशा संदर्भात विचारलेल्या प्रश्नावर त्यांनी पवार साहेबांची मी भेटच घेतली नाही असे सांगितले.
    या पत्रकार परिषदेचे प्रास्ताविक जिल्हाध्यक्ष ऍड राजेश्वर चव्हाण यांनी केले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!