अंबाजोगाई

खा. डॉ अजित गोपछडे यांची केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक समिती वर निवड

अंबाजोगाई (प्रतिनिधी)–

भारत सरकार द्वारा स्थापित केंद्रीय पर्यटन तथा सांस्कृतिक मंत्रालय समिती वर राज्यसभा सदस्य खासदार डॉ. अजित गोपछडे यांची निवड करण्यात आली आहे.
केंद्रीय मंत्री श्री गजेंद्र सिंह जी शेखावत यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती गठीत करण्यात आली आहे.
एकूण 25 सदस्य असलेल्या या समिती मध्ये केंद्रीय मंत्री, राज्यसभा आणि लोकसभा सदस्य यांचा समावेश आहे.
महाराष्ट्र, कर्णाटक, तेलंगना राज्यातील सातवाहन शालिवाहन कालिन सांस्कृतिक वारश्याचे संवर्धन व्हावे. आपल्या मराठवाड्यातील दैदिप्यमान ऐतिहासिक पर्यटन स्थळांचा अधिक विकास व्हावा म्हणून शालिवाहन कोरिडोर (जैन, बौद्ध, सिख, सनातन टुरिझम सर्किट) तयार व्हावे यासाठी खासदार डॉ. अजित गोपछडे यांनी मंत्रालयाकडे प्रस्ताव दाखल केला आहे. तसेच यासाठी ते सतत प्रयत्नशील आहेत. त्यांची पर्यटन आणि सांस्कृतिक क्षेत्रातील रुची आणि कृतिशीलता लक्षात घेऊन त्यांची या समिती वर निवड करण्यात आली आहे.
श्री गुरु गोविंद सिंघ जीं च्या पावन नगरीतील भूमीपूत्र असलेले खा. डॉ. अजित गोपछडे हे आता पर्यटन आणि सांस्कृतिक विकासात अधिक योगदान देऊ शकतील, अशी अपेक्षा या क्षेत्रातील तज्ञ व्यक्त करित आहेत.
आपल्या क्षेत्रातील वेरुळ, अजिंठा, घृष्णेश्वर, देवगिरी किल्ला, पैठण, माहूर, नरसी नामदेव, औंढा नागनाथ, परळी वैद्यनाथ, तख्त सचखंड गुरुद्वारा तथा गोदावरी नदी तीर्थक्षेत्र नांदेड, बीदर, बासर, कंदकुर्ती इ.सर्व पर्यटन स्थळांचा सर्वागीन विकास करुन देशविदेशातील पर्यटकांना या भागात येण्यासाठी आकर्षित करुन पर्यटनातून रोजगार निर्माण करु. असा निर्धार खा. डॉ. अजित गोपछडे यांनी व्यक्त केला आहे.

खा. डॉ. अजित गोपछडे यांचा अंबाजोगाईशी ऋणानुबंध !

राज्यसभेचे सदस्य म्हणून नियुक्त करण्यात आलेले खा. डॉ. अजित गोपछडे आणि अंबाजोगाई यांचा गेली अनेक वर्षांपासून ऋणानुबंध आहे. खा. डॉ. अजित गोपछडे यांचे वैद्यकीय पदवी आणि पदव्युत्तर शिक्षण हे अंबाजोगाई येथील स्वामी रामानंद तीर्थ वैद्यकीय महाविद्यालयात झालेले असल्यामुळे त्यांचा हा ऋणानुबंध जोडला गेला आहे. हा ऋणानुबंध आजही कायम आहे याचा अंबाजोगाईकरांना आनंद आहे. त्यांच्या नियुक्तीबध्दल अंबाजोगाई शहरातील अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

error: Content is protected !!