*मतिमंद मुलींच्या सहवासात वाढदिवस साजरा करण्याची कु. प्रांजलीच्या मनात सुचलेली कल्पना कौतुकास्पद* प्राचार्य महादेव पुजारी यांचे उदगार
अंबाजोगाई (प्रतिनिधी)
मतिमंद मुलींच्या सहवासात वाढदिवस साजरा करून त्यांना आवश्यक वस्तू भेट देण्याची कु. प्रांजलीच्या मनात जी कल्पना सुचली त्याच कौतुक करावे तेवढे कमीच असुन मला या कार्यक्रमात सहभागी होता आले हे मी माझे भाग्य समजतो असे उदगार परळी येथील शासकीय तंत्र निकेतनचे प्राचार्य महादेव पुजारी यांनी काढले.
अंबानोगाई येथील कर्तव्य मतिमंद मुलीच्या विद्यालयात आयोजित करण्यात आलेल्या या कार्यक्रम प्रसंगी परळी औष्णिक विद्युत केंद्रातील लेखापाल सुनील जाधव, कै बाबासाहेब परांजपे शिक्षण संस्थेचे कार्यवाह संभाजी लांडे, पत्रकार पूनमचंद परदेशी, आरेफ सिद्धीकी, मनोज जाधव जेष्ठ पत्रकार दत्तात्रय अंबेकर, सौ शामल अंबेकर यांची तर कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी संस्थेचे उपाध्यक्ष चंद्रकांत काळम यांची उपस्थिती होती.
या प्रसंगी बोलताना महादेव पुजारी म्हणाले की, या कार्यक्रमाच्या निमित्याने संभाजी लांडे हे माझे जुने मित्र अनेक वर्षांनी मला भेटले पत्रकारात जसे दत्ता अंबेकर कर्तव्यनिष्ठ, निर्भीड व्यक्तिमत्व आहेत तसेच चळवळी मधील कार्यकर्ते राहिलेले संभाजी लांडे हे ही कर्तव्य दक्ष व निर्भीड आहेत. ते मतिमंद मुलींची शाळा चालवतात हे पाहून मनोमन आनंद झाला आणि या शाळेतील मुलींच्या सहवासात प्रांजली या आमच्या लेकीला वाढदिवस करण्याची जी कल्पना सुचली त्या बद्दल तीच कौतुक करावे तेवढे कमीच आसून या ठिकाणी या मुलींच्या हस्ते माझा जो सत्कार झाला तो आज पर्यंतच्या सर्व सत्कारा पेक्षा मोठा मी समजतो.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक करताना संभाजी लांडे म्हणाले की, कर्तव्य मतिमंद मुलींची शाळा ही मराठवाड्यातील एकमेव मतिमंद मुलींची शाळा असून ती आम्ही चालवतो याचा आम्हाला अभिमान आहे. आमचा कर्मचारी वर्गही या सर्व मतिमंद लेकरांना कुटुंबातील व्यक्ती पेक्षाही अधिक प्रेम देतो, सामाजिक भान असलेल्या लोकांच्या सहकार्याने आज पर्यंत या शाळेचा प्रवास सुरु असून अलीकडेच शाळेला अनुदान मिळू लागल्याने आमचा भार खूप कमी झाला आहे. आज पर्यंत किरायाच्या जागेत असलेली ही शाळा लवकरच स्वतःच्या जागेत जाणार असल्याचे त्यांनी अभिमानाने सांगितले.
या वेळी दत्तात्रय अंबेकर व पुनमचंद परदेशी यांच्या सह कु प्रांजलीने या ठिकाणी वाढदिवस करताना मला मनातून आनंद मिळतो अशा भावना व्यक्त केल्या आणि सर्व मुलींना त्यांना दैनंदिन लागणाऱ्या टूथब्रश, टूथ पेस्ट व खाऊंचे वाटप केले.
या कार्यक्रमाचे सूत्रसंचलन अनुजा नरहरी यांनी केले तर हा कार्यक्रमात कर्तव्य मतिमंद मुलींच्या शाळेतील कर्मचारी दिलीप रानमारे, दीपक काळम भानुदास तारळकर, सुरेखा भोसले, सारिका मग्गीरवार, सारिका गायकवाड, गणेश धारमोडे, परी नेवल यांनी उत्सहाने सहभाग घेतला.
